Beed News : 19 वर्षीय तरुणाने लॉजमध्येच गळ्याला लावला फास!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

A 19-year-old youth committed suicide by hanging himself in a lodge in Ambajogai Beed
A 19-year-old youth committed suicide by hanging himself in a lodge in Ambajogai Beed
social share
google news

Ambajogai Suicide Case : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुण शहरातील एका लॉजमध्ये आला होता. रूमचा दरवाजा बराच वेळ झाला तरी न उघडल्याने कर्मचाऱ्याने खिडकीतून डोकावून पाहिले, त्यानंतर त्याला घामच फुटला. (A 19-year-old youth committed suicide by hanging himself in a lodge in Ambajogai Beed)

ADVERTISEMENT

शहरातील योगेश्वरी मंदिराच्या बाजूला असलेल्या राधा लॉजमध्ये एका 19 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी (07 ऑक्टोबर) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.

ICC WC Ind vs Aus: भारतासमोर मोठं आव्हान, ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ 5 खेळाडू ठरू शकतात घातक!

विवेकानंद पंडित येडे (वय 19,रा. सोमनाथ बोरगाव, ता.अंबाजोगाई)) असं गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. हा तरुण दुपारी योगेश्वरी मंदिराच्या बाजूला असलेल्या राधा लॉजमध्ये गेला होता. त्याने त्या ठिकाणी एक रुम बुक केली. रुमचा दरवाजा खूप वेळ झाला तरी उघडला नसल्याने लॉजच्या कर्मचाऱ्याने खिडकीतून पाहणी केली. यावेळी या तरुणाने आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले.

हे वाचलं का?

Israel Palestine Crisis: इस्रायलमधील युद्धात बॉलिवूड अभिनेत्री बेपत्ता! सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहीली नव्हती. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण, कळू शकलं नाही. दरम्यान, आत्महत्या मुलीच्या प्रकरणातून केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT