मुलासह विमानातून बंगळुरूला येत होती महिला, पण…; मृतदेहच उतरवला

मुंबई तक

ADVERTISEMENT

woman passenger died onboard Air India flight
woman passenger died onboard Air India flight
social share
google news

woman passenger died onboard Air India flight : एअर इंडियाच्या विमानाने सॅन फ्रान्सिस्कोहून बंगळुरूला परतणाऱ्या 69 वर्षीय वृद्ध महिलेचा प्रवासादरम्यानच मृत्यू झाला. प्रवासी महिलेच्या मृत्यूची ही बातमी एअर इंडियाने बंगळुरूहून दिली आहे. एक 69 वर्षीय महिला आपल्या मुलासोबत सॅन फ्रान्सिस्कोहून परतत होती. विमान प्रवासादरम्यान महिलेचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती नंतर समोर आली. (A 69 year old woman passenger died onboard Air India flight from San Francisco to Bengaluru.)

ADVERTISEMENT

ही महिला मंगळवारी (9 मे) सॅन फ्रान्सिस्कोहून एअर इंडियाच्या सर्वात लांब पल्ल्याच्या विमानात बसली होती. एअर इंडियाच्या एआय 176 या फ्लाइटमध्ये महिला आपल्या मुलासोबत बसली होती. सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार, विमान बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर महिलेचा मृतदेह तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आला. जिथे महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

बुधवारी सकाळी 11 वाजता परिस्थिती आणखीनच बिघडली

विमानातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (10 मे) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महिलेने विमान प्रवासादरम्यान अचानक अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. इन-फ्लाइट वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, फ्लाइट क्रू पूर्णपणे सक्रिय झाला होता. विमानात उपलब्ध असलेल्या सर्व उपकरणांसह महिलेला वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. पण खूप प्रयत्न करूनही महिलेची अस्वस्थता कमी होत नव्हती. आणि सर्व प्रयत्न करूनही, महिलेचा प्रवासादरम्यान फ्लाइटमध्येच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरेंसमोर…; अजित पवार सुषमा अंधारेंवर भडकले

मृत्यूचं कारण येणार समोर, महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जाणार

गुरुवारी (12मे ) सकाळी साडेसात वाजता विमान लँड होताच वैमानिकांनी विमानतळ अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्याचे सांगण्यात आलं. या वृत्तानंतर लगेचच विमानतळावरील ग्राउंड टीम अलर्ट मोडमध्ये आली. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णवाहिकेतून महिलेला विमानतळ रुग्णालयात नेण्यात आला.

हेही वाचा >> धनुष्यबाण आणि शिवसेनेचं काय होणार? कोर्टाच्या निकालानंतर राज ठाकरेंचा सवाल

मात्र, महिलेचा मृत्यू त्यापूर्वीच झालेला होता, त्यामुळे तिला पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. फ्लाइटमध्ये चढल्यानंतर लगेचच महिलेची प्रकृती बिघडली आणि ती आधीच काही आजाराने त्रस्त होती असा अंदाज वर्तवला जात आहे. महिलेचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT