18 बॉयफ्रेंड, 1 नवरा अन् कोट्यावधींची फसवणूक : महिला अशी अडकवायची सापळ्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

a model by profession, did fraud with about 20 men to live a luxury life.
a model by profession, did fraud with about 20 men to live a luxury life.
social share
google news

लक्झरी लाइफ जगण्यासाठी तब्बल 20 पुरुषांना फसवल्याप्रकरणी नुकतचं चीनमधील शांघाय पोलिसांनी वू नामक एका मॉडेलला अटक केली आहे. या 20 जणांमध्ये एक पती, 18 प्रियकर यांचा समावेश असून फसवणुकीची रक्कम 2 कोटींहून अधिकची असल्याची माहिती आहे. तिच्याबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. (One husband, 18 boyfriends and fraud of more than Rs 2 crore, story of a married woman)

ADVERTISEMENT

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, वू एकाच वेळी 18 पुरुषांशी डेटिंग करायची. पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी ती वेगवेगळे फंडे अवलंबत असे. 2017 पासून ती पुरुषांशी प्रेमसंबंध निर्माण करायची, लोक तिच्या तावडीत सापडले की त्यांच्याकडून पैसे उकळायची आणि त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जायची. अशा पद्धतीने अनेकांनी वू ला लाखो रुपये ट्रान्सफर केले. तर काहींनी कर्ज काढून पैसेही दिले. पोलीस चौकशीत वू ने एकूण 2 कोटी 38 लाख रुपयांचा गंडा घातल्याच समोर आलं आहे.

धाराशिव : बलात्काराच्या आरोपीने जामिनावर सुटताच पुन्हा त्याच चिमुकलीवर केला अत्याचार

महिलेने फसवणुकीचे जाळे कसे पसरवले?

वू ने 2014 मध्ये झेंग नावाच्या व्यक्तीशी कायदेशीर विवाह केला. या लग्नातून त्यांना एक मुलगा आहे. मात्र तिने हे तिच्या कोणत्याही पुरुष मित्राला सांगितले नाही. पण काही तिच्यावर संशय आला. त्यांनी वूकडे पैसे परत मागायला सुरुवात केली. पोलिसांत तक्रार करण्याची धमकीही देऊ लागले. यावर मात करण्यासाठी वूने नवीन पुरुषांना जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली. ती नवीन लोकांकडून पैसे घेऊन जुन्या लोकांना देऊ लागली. अशा प्रकारे त्याच्या फसवणुकीची यादी लांबत गेली.

हे वाचलं का?

Pune: मुलीने दिलेल्या नकारामुळे नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, पुण्यात नेमकं काय घडतंय?

कधी वडिलांच्या कॅन्सरच्या नावावर तर कधी भावाच्या लग्नाच्या नावावर फसवणूक :

वू कधी वडिलांच्या कॅन्सरच्या उपचाराच्या नावावर तर कधी भावाच्या लग्नाच्या नावावर प्रियकरांकडून पैसे उकळायची. स्वत:साठी फ्लॅट खरेदी करण्यासाठी आणि वेगवेगळी बिले भरण्यासाठी तिने पुरुष मित्रांकडून फसवणूक केली असल्याची माहिती आहे. वूला शांघाय पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली आहे. चौकशीदरम्यान, सुरुवातीला तिने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा मान्य केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT