Adam Britton : घृणास्पद! 39 कुत्र्यांसोबत बलात्कार करून हत्या, कारण…
Adam Britton : एडमने तब्बल 39 कुत्र्यांना टॉर्चर करत त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या केली आहे. 52 वर्षाचा आरोपी एडमने हा गुन्हा न्यायालयात कबुल केला आहे.
ADVERTISEMENT
जगभरातून बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र काही घटना इतक्या क्रुर असतात की त्याची कल्पनाही करवत नाही. आता अशीच एक क्रुरतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका आरोपीने तब्बल 39 कुत्र्यांवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच आरोपी बलात्कार करून थांबला नाही तर त्याने त्यांची निर्घृण हत्या देखील केली. या घटनेने सध्या शहर हादरलं. (australia 39 dogs raped and killed used tortured room british crocodile expert shocking story)
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) ब्रिटेनमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीचे नाव एडम ब्रिटन आहे, तो एक जिओलॉजिस्ट होता. या एडमने तब्बल 39 कुत्र्यांना टॉर्चर करत त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या केली आहे. 52 वर्षाचा आरोपी एडमने हा गुन्हा न्यायालयात कबुल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीन एडमने 2014 साली 49 कुत्र्यांचे लैंगिक शोषण केले. या लैंगिक शोषणात त्याच्या स्वत:च्या दोन पाळीव कुत्र्यांचा देखील समावेश आहे.
हे ही वाचा : Rajasthan : वसुंधरा राजेंना भाजपने शोधला पर्याय! कोण आहेत महाराणी दिया कुमारी?
ऑनलाईन पोर्टल केलं सुरु
आरोपी एडमने कुत्र्यांवर बलात्कार करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले होते. यासाठी तो ब्रिटेनवरून ऑस्ट्रेलियाच्या गमेट्रीला आला होता. या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आरोपी पाळीव प्राण्यांच्या देखभालीची सर्विस द्यायचा. त्यामुळे ज्या पाळीव कुत्र्यांचा मालकांना कामामुळे कुत्र्यांच्या देखभालीकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. ते मालक देखभालीसाठी आरोपीकडे कुत्रे सोडून जायचे. आणि अशाप्रकारे एडम या पाळीव प्राण्यांचे शोषण करून त्यांच्यावर बलात्कार करायचा.
हे वाचलं का?
धक्कादायक म्हणजे आरोपीने यासाठी एक टॉर्चर रूमही बनवला आहे. या टॉर्चर रूममधला त्याने एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत तो कुत्र्यांना मारताना दिसतोय. तसेच एडमने कुत्र्यावर बलात्कार करतानाचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले होते.
आता या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्याला पाळीव प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 56 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. याशिवाय बाल शोषण सामग्रीशी संबंधित चार प्रकरणांमध्येही दोषी ठरवले आहे. सध्या त्याला कोठडीत पाठवण्यात आले असून 13 डिसेंबर 2023 रोजी त्याला शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : छगन भुजबळ शरद पवारांना तुरुंगातून करायचे ब्लॅकमेल; रमेश कदमांनी टाकला ‘बॉम्ब’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT