Honey Trap: तरुणांसोबत अश्लील Video कॉल, चपलेचा हार घालून महिलेला फिरवलं गावभर
Honey Trap Crime: एका 38 वर्षीय महिलेला तरुणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणं फारच महागात पडलं आहे. पाहा गावकऱ्यांनी महिलेला काय शिक्षा केली.
ADVERTISEMENT
Extort Money from Boys Honey Trap: बेळगाव: कर्नाटकातील बेळगाव येथे, एका 38 वर्षीय महिलेने अनेक पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले होते. पण ही गोष्ट जेव्हा उजेडात आली तेव्हा तिला गावातील लोकांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर महिलेला चपलांचा हार घालून तिची धिंडही काढली. (belgaum woman used to extort money from boys by luring them into honey trap villagers beat her garlanded her with slippers)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, अनेक पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या महिलेला गावातील लोकांनी मारहाण केली. पोलिसांनी नंतर महिलेची सुटका केली आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 13 जणांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने अनेकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Ajit Pawar: ‘मी कुणाचीच…’, अजितदादांनी सोडलं मौन, मीरा बोरवणकरांना प्रत्त्युतर
यानंतर लोकांच्या एका गटाने तिच्या घराला घेराव घातला. वादानंतर लोकांनी महिलेला बेदम मारहाण केली आणि नंतर चपलांचा हार घातला. त्यानंतर त्यांनी आरोपी महिलेला भर गावात फिरवलं.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्हाला डायल 112 वर कॉल आलेला, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेची सुटका केली. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तिला किरकोळ दुखापत झाली आहे.
ADVERTISEMENT
ते म्हणाले, सुरुवातीला महिलेने ही आपली अंतर्गत बाब असून ते आपापसात सोडवू, असे सांगून तक्रार देण्यास नकार दिला, परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिने तक्रार देण्याचे मान्य केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Ajit Pawar: ‘ते म्हणाले, मॅडम, तुम्ही यात पडू नका..’, मीरा बोरवणकरांचा आणखी मोठा गौप्यस्फोट
बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेड यांनी सांगितले की, ‘महिलेच्या तक्रारीवरून भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले, 13 जणांवर मारहाणीचा आरोप आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT