Delhi Crime : मुंडक कापलं, शरीराचे केले तुकडे; दृश्य बघून पोलिसांना फुटला घाम
दिल्लीच्या गीता कॉलनी फ्लायओव्हर जवळ मुलीच्या शरीराचे तुकडे तुकडे आढळून आले आहेत. यामध्ये तरूणीचे मुंडक आणि काही बॉडी पार्टचा समावेश आहे. या घटनेत श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणेच मुलीचे तुकडे तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली आहे.
ADVERTISEMENT
दिल्लीत (Delhi) पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. ज्याप्रमाणे आफताबने श्रद्धा वालकरचे शरीराचे तुकडे तुकडे करून तिची निर्घृण हत्या करून विल्हेवाट लावली होती.अशीच घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. दिल्लीच्या गीता कॉलनी (Geeta Colony) फ्लायओव्हर जवळ मुलीच्या शरीराचे तुकडे तुकडे आढळून आले आहेत. यामध्ये तरूणीचे मुंडक आणि काही बॉडी पार्टचा समावेश आहे. या घटनेत श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणेच मुलीचे तुकडे तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता फ्लायओवर जवळच्या जंगलात सर्च ऑपरेशन राबवून तपास करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वर्षभरातच श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याने दिल्ली पुन्हा हादरली आहे. (chopped up body women found near flyover delhi geeta colony crime story)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
दिल्लीच्या गीता कॉलनी फ्लायओव्हरजवळ शरीराचे तुकडे तुकडे केलेल्या अवस्थेत एका तरूणीचा मृतदेह आढळला आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. यावेळी घटनास्थळी दाखल होताच पोलिसांना मुलीच्या शरीराचे अनेक पार्ट तुकड्या तु़कड्यात आढळले. घटनास्थळावरून पोलिसांनी तरूणीचे मुंडक आणि इतर शरीराचे पार्ट आढळले आहे. तरूणीच्या बॉडीचे अनेक पार्ट याच ठिकाणी सापडतील असा दाट संशय असल्याने पोलिसांनी फ्लायओव्हर लागून असलेल्या जंगलात तपास करायला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : DRDO Scientist : प्रदीप कुरुलकरने कंत्राटासाठी महिलेसोबत ठेवले शरीर संबंध
या प्रकरणात पोलिसांना संशय आहे की, मुलीच्या शरीराचे अनेक बॉडी पार्ट फ्लायओव्हर जवळच्या जंगलात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरुच ठेवले आहे. दरम्यान अद्याप तरी पोलिसांना या मुलीची ओळख पटली नाही आहे. पोलीसांनी या मुलीची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हे वाचलं का?
श्रद्धा वालकर हत्याकांड नेमके काय?
दरम्यान याआधी 18 मेला दिल्लीत श्रद्धा हत्याकांड घडलं होते. दिल्लीच्या महरोलीमध्ये प्रियकर आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. या हत्येनंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते.आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी एक फ्रिज देखील खरेदी केला होता. या फ्रिजमध्ये आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. तसेच आफताब दररोज रात्री जंगलात जाऊन श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे टाकून त्याची विल्हेवाट लावायचा.
या घटनेने दिल्ली हादरली होती.
श्रद्धा वालकर प्रमाणेच या प्रकरणात देखील मुलीच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेला श्रद्धा वालकर हत्याकांडप्रमाणे जोडले जात आहे. तसेच श्रद्धा वालकर हत्याकांडप्रमाणेच त्याचा तपास देखील केला जात आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime News : लोकांनी चिडवलं अन् आईच्या प्रियकराला संपवलं, 44 वर्षानंतर…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT