Nagpur Crime : 14 किलो सोने, 200 किलो चांदी अन् 17 कोटी रोख; पोलिसही चक्रावले!
हे प्रकरण आहे गोंदिया येथील एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीने एका व्यावसायिकाला बनावट सट्टेबाजी अॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 58 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं.
ADVERTISEMENT

Nagpur police Raid on cricket bookie house : नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे एका व्यावसायिकाची तक्रार आली. एका व्यक्तीने ऑनलाईन सट्ट्यात तब्बल 58 कोटी रुपये उडवले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तपासाची चक्रे फिरवली गेली आणि क्रिकेट बुकीच्या घराचा ठिकाणा सापडला. त्यानंतर पोलिसांनी गोंदियातील त्याच्या घरी धाड टाकली. त्यावेळी घरात सापडलेली मालमत्ता बघून पोलिसही चक्रावून गेले. (The Nagpur police found cash worth more than Rs 17 crore, about 14 kg gold and 200 kg silver)
हे प्रकरण आहे गोंदिया येथील एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीने एका व्यावसायिकाला बनावट सट्टेबाजी अॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 58 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या गोंदियातील काका चौकातील घरावर छापा टाकला तेव्हा पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.
बुकी दुबईला गेला पळून
घरात पोलिसांना 17 कोटींहून अधिक रुपयांची रोकड, सुमारे 14 किलो सोने आणि 200 किलो चांदी सापडली, जी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वीच आरोपी घरातून पळून गेला.
वाचा >> PM नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतुक, अर्थ काय?
याबद्दल अधिक माहिती अशी की, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म तयार करणारा कथित ‘बुकी’ अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन हा नागपूरपासून 160 किमी अंतरावर असलेल्या गोंदिया शहरात राहतो. पोलिसांनी जैनच्या घरावर छापा टाकला तेव्हा तो त्याच्या एक दिवस आधी दुबई फरार झालेला होता.