विवाहित तरूणाचा कारनामा, आधी तरूणीला भुलवून ठेवले शरीरसंबंध आणि नंतर मात्र...
crime news : आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले, नंतर तिला नशेचे पदार्थ देऊन तिचं लैंगिक शोषण केलं. तरुणाविरोधात पीडितेचे गंभीर आरोप.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नशेचे पदार्थ देऊन तिचं लैंगिक
तरुणाने पीडितेला गर्भपात करण्यास पाडलं भाग
Crime News: लखनऊच्या मांडिया भागातील एका तरुणीने एका खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर ब्लॅकमेलिंग, लैंगिक शोषण आणि गर्भपाताचा गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेचं म्हणणं आहे की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले, नंतर तिला नशेचे पदार्थ देऊन तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तरुणाने पीडितेचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. जेव्हा महिला गर्भवती राहिली होती, तेव्हा त्याने तिला गर्भपात करण्यास जबरदस्ती केली. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, आरोपीचे आधीच लग्न झाले होते. तो त्याच्या डॉक्टरांसह पीडितेला धमकी देत आहे.
हे ही वाचा : 'तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां## की...?', पीएसआयकडून तरुणींवर गंभीर आरोप, पुण्यात नेमकं काय घडलं?
पीडितेचा आरोप
पीडितेचा आरोप आहे की, शिवानंद सिंग नावाचा आरोपी हा प्रयागराज येथील रहिवासी आहे. तो कल्याणपूर येथील एका रुग्णालयात कार्यरत आहे. तो त्याच्या आजारीअसलेल्या आजोबांची काळजी घेण्याचं खोटं कारण सांगत तरुणीला जवळ करू लागला आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर 18 एप्रिल 2024 शिवानंदने मुलीला त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले आणि तिला नशेचे पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.
दरम्यान, त्याने मुलीचा व्हिडिओही बनवला आणि तिला अनेकदा धमकावू लागला. काही काळनंतर. मुलगी गर्भवती राहिली असता, आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, जेव्हा तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा तिला कळले की, आरोपी लॅब टेक्निशियनशी लग्न झाले आहे.










