Delhi Crime: सपासप.. चाकूचे 40 वार नंतर दगडाने केला गर्लफ्रेंडचा चेंदामेंदा

मुंबई तक

ADVERTISEMENT

delhi crime 16 year old girl stabbed wound and stoned to death delhi women commision
delhi crime 16 year old girl stabbed wound and stoned to death delhi women commision
social share
google news

16 Year Old Girl Murder in Delhi : नवी दिल्लीला (New Delhi) हादरवून टाकणारी हत्येची एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका माथेफिरू बॉयफ्रेंडने (Boyfriend) चाकू आणि दगडाने ठेचून 16 वर्षीय अल्पवयीन गर्लफ्रेंडची (Girlfriend) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही संपूर्ण घटना एका रस्त्यावर घडली आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्याने संपूर्ण घटनाक्रम घडवून आणला आहे. या घटनाक्रमाने दिल्लीत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान हा संपूर्ण घटनाक्रम आहे? तो जाणून घेऊयात. (delhi crime 16 year old girl stabbed wound and stoned to death delhi women commision)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मृत तरूणीचे नाव साक्षी आहे, तर आरोपीचे नाव साहिल पुत्र सरफराज आहे. मृत मुलगी ही ई 36 जेजे कॉलनीत राहणाऱ्या जनकराज यांची मुलगी आहे. मृत मुलगी साक्षी आणि साहिल हे दोघेही नात्यात होते. मात्र रविवारी कोणत्या तरी मुद्यावरून त्यांच्यात भांड़ण झाले होते. या भांडणानंतर साक्षी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्यासाठी घरातून निघाली होती.

हे ही वाचा : ‘तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर सेक्स…’, बहिणीच्या नवऱ्यानेच 8 महिने केला रेप

या दरम्यान रस्त्यातच साहिलने साक्षीला थांबवले आणि तिच्यासी वाद सुरु केला होता. हा वाद वाढताच आरोपी साहिलने चाकूने काढून साक्षीवर 40 वार केले. इतके वार करून देखील त्याला राग शमला नाही म्हणून त्याने दगडाने देखील तिला ठेचले. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. भर रस्त्यात साहिल साक्षीची हत्या करत आहे.या दरम्यान रस्त्यावर नागरीक देखील चालताना दिसत आहे. हा सपूर्ण घटनाक्रम झाल्यानंतर साहिलने घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेनंतर स्थानिकांनी साक्षीला रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यानच तिचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर साक्षीच्या वडिलांनी शाहदाबाद पोलीस (Shahdabad Police) ठाण्यात आयपीसी धारा 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी साहिल सध्या फरार आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.

हे वाचलं का?

महिला आयोगाची नोटीस

साक्षी हत्या प्रकरणाची दखल दिल्लीच्या महिला आयोगाने (Delhi women Commission) देखील घेतली आहे. या घटनेवरून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या की, दिल्लीच्या शाहबाद डेरीत एका अल्पवयीन मुलीची चाकुने वार करून हत्या करण्यात आली, त्यानंतर तिला दगडाने ठेचण्यात आले होते. दिल्लीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी पोलिसांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात आरोपीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, मी माझ्या करिअरमध्ये यापेक्षा भयानक घटना पाहिले नाही आहे, असे देखील मालिवाल यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : OYO मध्ये 4 मित्रांसोबत गेला नंतर छतावरून मारावी लागली उडी, भयंकर घटना

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT