Pune : ‘मुलाचं निधन झालंय, डीजे वाजवू नका’, 21 जणांनी अवघ्या कुटुंबाला केली बेदम मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune talegaon dabade dj stop family asking son died after 21 men beat family with sticks and iron bars dj sound system
pune talegaon dabade dj stop family asking son died after 21 men beat family with sticks and iron bars dj sound system
social share
google news

Pune Crime: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात गणेशोत्सवाचा धुमधडाका सुरु आहे. त्यात आज अनंत चतुर्थी असल्याने राज्यभरात जोरदार उत्सव साजरा केला जात आहे. कोणी ढोल ताशाच्या आवाजात तर कोणी डीजेच्या (DJ sound system) दणदणाटात बाप्पाला निरोप देतं आहे. असे असतानाच पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. घरात दु:खद निधन झाल्याने गणपती मिरवणूकीला घराजवळून जाताना डीजे वाजवण्यास मनाई केली होती. मात्र आरोपींनी याचा राग मनात धरून कुटुंबियांना मिरवणूकीनंतर बेदम मारहाण केली आहे. 25 सप्टेंबरला ही धक्कादायक घटना घडली आहे.  (dj stop family asking brutally beaten pune somatane phata 21 people arrested)

ADVERTISEMENT

मुलाच्या दुःखात कुटुंब

गणेश विसर्जनाची सोमाटणे फाटा येथे डीजेच्या दणदणाटात मिरवणूक चालू होती. त्याचवेळी येथील एक कुटुंब आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दुःख सागरात बुडालेले होते. कुटुंब दुःखात असताना गणेश विसर्जन मिरवणूक घराजवळून जात असताना कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, आमच्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे आम्ही दुःखात आहोत. म्हणून तुम्ही घरासमोर डीजे लावू नका. पुढं जाऊन तुम्ही डीजे लावा. त्यानंतर डीजे बंदही करण्यात आला.

हे ही वाचा >> Viral Video : लोकलमध्ये घडले Slap War, कॉलर पकडत एकमेकांची कानशिलं केली लाल…

डीजे बंद केला पण…

ज्या मंडळाने डीजे लावून मिरवणूक चालू केली होती, ती बंद करावी लागली म्हणून मंडळाच्या काही मुलांना राग आला. त्या कुटुंबाने डीजे बंद करायला लावला म्हणून 21 जणांनी काठ्या, कोयता आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. त्यामध्ये कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Mathura Train Video : दारूची नशा, व्हिडिओ कॉल…, लोकल थेट चढली प्लॅटफॉर्मवरच

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

कुटुंबाला मारहाण केल्या प्रकरणी आता तळेगाव पोलिसात 21 जणांविरोधात सुनील प्रभाकर शिंदे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी सुनील बंदा रजपूत (वय 28), मुकेश करसन रजपूत (26), रवी करसन रजपूत (30), सनी करसन रजपूत (32), प्रवीण करसन रजपूत (30), अक्षय ज्ञानेश्वर काकडे (28), अतुल वेलसी रजपूत (21), कृष्णा बलभीम खराते (23), रवी हिरा रजपूत (28), संदीप रमेश रजपूत (29), विशाल काळुराम रजपूत (29), संतोष काळुराम रजपूत (25), विलास हिरा रजपूत (22), अनिल हिम्मत रजपूत (31), करसन जयंती रजपूत (50), दीपक हिम्मत रजपूत (32), आकाश अशोक रजपूत (21), काळुराम भिका रजपूत (55), वसंत भिका रजपूत (51), अमित वेलसी रजपूत (24) आणि रमेश जयंती रजपूत (50, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा) यांच्यावर गुन्हा नोंद करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT