हनी ट्रॅपमध्ये अडकला DRDO चा शास्त्रज्ञ, गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी पुण्यातून अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

drdo scientist arrested by maharashtra ats
drdo scientist arrested by maharashtra ats
social share
google news

DRDO Scientist Arrested : पाकिस्तानी एजंटला (Pakistani Agent) गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी डीआरडीओचे शास्त्रज्ञ (DRDO Scientist) प्रदीप कुरुलकर यांना महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून अटक केल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानला व्हाट्सअ‍ॅपवरून कॉल आणि मॅसेजवरून गुप्त माहिती पुरवल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने (maharashtra ATS)  त्यांना अटक केली. सध्या प्रदीप कुरुलकर यांच्यावर शासकीय गुपीते अधिनियम1923 कलम 03(1)(क), 05(1)(अ), 05(1)(क), 05(1)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दहशतवाद विरोधी पथकाचे (Anti-Terrorism Squad) पुणे युनिट करीत आहे. (drdo scientist arrested by maharashtra ats for sharing information)

शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर डीआरडीओचे (DRDO Scientist) पुणे येथील कार्यालतातून कर्तव्य बजावायचे. या कार्यालयातूनच पाकिस्तानचे इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या हस्तकाशी संपर्कात होते. यावेळी याच कार्यालयातून प्रदीप कुरुलकर यांनी अनेकदा व्हाट्सअ‍ॅप व्हाईस कॉ़ल,व्हिडिओ कॉ़ल आणि मेसेज अशा विविध माध्यमांद्वारे भारता संबंधी गुप्त माहिती पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या हस्तकाला पुरवली होती. या संबंधित माहिती महाराष्ट्र एटीएसला लागली होती. यानुसार आज महाराष्ट्र एटीएसने (maharashtra ATS)   डीआरडीओचे शास्त्रज्ञ (DRDO Scientist) प्रदीप कुरुलकर यांना अटक केली आहे. या अटकेने एकच खळबळ माजली आहे.

हे ही वाचा : शारीरिक संबंध ठेवून… महिला पोलीसच करायची भयंकर कृत्य

दरम्यान या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य पोलीस ठाणे, काळाचौकी, मुंबई गु.र.न. 02/2023 शासकीय गुपीते अधिनियम1923 कलम 03(1)(क), 05(1)(अ), 05(1)(क), 05(1)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथकाचे पुणे युनिट करीत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणात डीआरडीओचे शास्त्रज्ञ (DRDO Scientist) प्रदीप कुरुलकर हे हनीट्रॅपचे शिकार झाले होते.या हनीट्रॅपमुळेच त्यांनी संबंधित पाकिस्तानचे इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या हस्तकाला भारतासंबंधी गुप्त माहिती शेअर केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा : ‘एका बॅगेत मुंडकं, दुसऱ्या बॅगेत…’अल्पवयीन बायकोचे नवऱ्याने केले तुकडे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT