Yashwant Verma : जजच्या बंगल्याला आग, विझवताना सापडली भली मोठी कॅश, CJI कडून थेट बदलीचा निर्णय

मुंबई तक

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली तेव्हा ते शहरात नव्हते. आग लागल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केलं होतं. यावेळी आग विझवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे सगळं दिसलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यशवंत वर्मा यांच्या घराला लागली होती आग

point

आग विझवताना समोर आलं वेगळंच प्रकरण

point

प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांपर्यंत

Yashwant Verma Cash Case : देशभरात काल दिल्ली उच्च न्यायालयायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे  यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात आग लागली होती, ती विझवण्यासाठी गेलेल्या टीमला तिथे मोठी रोकड सापडली. त्यानंतर  सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बदलीची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील तीन वरिष्ठ न्यायाधीशांच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती वर्मा यांना त्यांच्या मूळ उच्च न्यायालयात म्हणजेच अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याची शिफारस केली आहे. 

न्यायमूर्ती यशवंत शर्मा यांच्या घरात मोठी रोकड सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, CJI संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : गोहत्या करणाऱ्यांवर मकोका लावणार, काय आहे मकोका, गुन्हेगारांना धाक का?

आग लागली तेव्हा न्यायमूर्ती वर्मा शहरात नव्हते. आग लागल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केलं होतं. आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना बंगल्यातील खोल्यांमध्ये मोठी रोकड सापडली. एवढी मोठी रोकड पाहून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अक्षरश: हादरले. रेकॉर्ड बुकमध्ये बेहिशेबी रोकड सापडल्याची अधिकृत नोंद करण्यात आली. सीजेआय यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर कॉलेजियमने बैठक घेऊन तात्काळ यशवंत शर्मा यांना अलाहाबादला पाठवण्याची शिफारस करण्यात आली.

तातडीची बैठक घेऊन घेतला निर्णय

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीची शिफारस करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तातडीची बैठक घेतली. या बैठकीत बदलीची शिफारस करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्तींविरोधातील अहवालानंतर गुरुवारी कॉलेजियमची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. अंतर्गत चौकशीचाही विचार केला जातोय. मात्र, त्याबद्दल खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp