Gangs of Pune: Sharad Mohol च नाही तर ‘हे’ होते पुण्यात दहशत माजवणारे टॉप 10 गँगस्टर

मुंबई तक

ADVERTISEMENT

gangs of pune not only sharad mohol gaja marne but these were top 10 gangsters terrorizing pune
gangs of pune not only sharad mohol gaja marne but these were top 10 gangsters terrorizing pune
social share
google news

Gangsters Terrorizing Pune: पूजा सोनावणे, पुणे: पुणे म्हणजे विदेयचं माहेरघर… पण ज्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार पुण्यात जितक्या वेगानं होतोय, तितक्याच वेगानं पुण्यातील गुन्हेगारी सुद्धा फोफावत चालली आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजेच दिवसाढवळ्या गोळीबारात झालेली कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळची हत्या. एकेकाळी याच शरद मोहोळच्या नावानं पुण्यातील कोथरुड थरथर कापायचं. शरद मोहोळच्या हत्येनं पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे ती पुण्यातल्या गॅंगवॉरची. पुण्यातला गॅंगवॉरसमोर कितीतरी सिनेमेही फिके पडतील. शरद मोहोळ हे फक्त एक नाव आहे, आज पुण्यातील अशा 10 गॅंगस्टर्सबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या नावानं एकेकाळी पुणं थरथर कापायचं, ज्यांच्या दहशतीमुळे पुण्यासोबत अवघा महाराष्ट्र हादरायचा. (gangs of pune not only sharad mohol gaja marne but these were top 10 gangsters terrorizing pune)

ADVERTISEMENT

यामध्ये 10 व्या नंबरवर असलेलं नाव म्हणजे पप्पू उर्फ संतोष गावडे. पप्पू गावडे पुण्यातील प्रसिद्ध गुंड नीलेश घायवळचा उजवा हात. सचिन कुडले हत्येप्रकरणी त्याला अटक झाली होती. याशिवाय कोथरूड आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, धमकी, दहशत पसरवणे, प्राणघातक हल्ला असे गुन्हे त्याच्यावर दाखल होतो.

सायंकाळी उशिरा पप्पू गावडे हा मित्रासोबत मोटारसायकलवरून घरी जात असताना स्कॉर्पिओमधून 10-12 लोक आले आणि त्यांनी पप्पूवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. पप्पूचा खून झाला आणि यामध्ये गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

9 व्या नंबरवर असलेलं नाव म्हणजे श्याम दाभाडे

तळेगाव, मावळ परिसरात गुंड श्याम दाभाडेची प्रचंड दहशत. तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात गुंड श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता. सचिन शेळके यांच्या हत्येसह श्याम दाभाडेवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, खंडणी, दरोडा असे एकूण 22 गुन्हे पुण्यासह अनेक शहरात दाखल होते. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे ठार झाला होता.

8 व्या नंबरवर संदीप मोहोळ

2006 मध्ये मारणे टोळीच्या सुधीर रसाळची देखील हत्या करण्यात आली. या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहोळवर. संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा. संदीप मोहोळला पैलवानकीचा शौक होता. राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रांमध्ये संदीप मोहोळचा वावर होता. तो मुठा गावचा सरपंच झालेला. यापुढेही जाऊन संदीप मोहोळने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आणि माथाडी कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष तो झाला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sharad Mohol : घरात जेवले, अंगणात काढला काटा… रक्षक बनून घेतला बदला

संदीप मोहोळ मुठा गावातून कोथरुडकडे यायला निघाला तेव्हा मारणे टोळीकडून संदीप मोहोळचा पाठलाग सुरु झाला. संदीप मोहोळला याची चाहूल लागली होती. संदीपची स्कॉर्पिओ कोथरुडमध्ये पोहोचल्यावर गाडीची काच हातोड्याने फोडण्यात आली आणि गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आलेली.

ADVERTISEMENT

7 वं नाव आहे ते म्हणजे आप्पा लोंढे

अप्पा लोंढे याची बारामती, दौंड, हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये प्रचंड दहशत होती. 1990 पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून, खुनाचे प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. चार गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली होती. 2002 मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना हल्लेखारांनी प्रथम त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि नंतर हत्याराने अनेक वार केलेले.

6 व्या नंबरबर आहे विठ्ठल शेलार

विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील गुंड आहे. मारणे टोळीसाठी वसुली करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यातून त्याने मुळशीत दोघांचा खून केलेला. त्यानंतर त्याच्या गुन्हयाचा नवीन अध्याय सुरु झाला. पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केलेले. त्याच्यावर 2014 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. विठ्ठल शेलारने 30 डिसेंबर 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. विठ्ठल शेलारच्या भाजपप्रवेशाला पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते. केवळ पक्षप्रवेशच नाही, तर त्याला भोर-वेल्हा-मुळशी या भागातील युवा मोर्चाचं अध्यक्षपदही बहाल करण्यात आलं होतं.

5 व्या नंबरवर आहे संतोष भरणे

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि राजकीय पाठबळ असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख्य गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक म्हणजे राकेश भरणेची टोळी. हिंजवडी, माणसह मावळ तालुक्यात मोठी दहशत असलेल्या कुप्रसिद्ध राकेश भरणे टोळीला 2017 साली दीड वर्षासाठी वाकड पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केलेले.

4 व्या नंबरवर आहे शरद मोहोळ

शरद मोहोळ ज्याचा 5 जानेवारी 2024 कोथरुडमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून करण्यात आला. ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारी जगताची ओळख झाली, त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता. गुंड संदीप मोहोळचा तो भाऊ होता. संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला. गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला अटक करणयात आली होती. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचं अपहरण केल्याप्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आलेली. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं.

हे ही वाचा>> Sharad Mohol : ‘… तर शरद मोहोळची हत्या झाली नसती, ‘त्या’ दोघांबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती

3 थ्या नंबरवर आहे बाबा बोडके

बोडके टोळीचा प्रमुख बाबा बोडकेवर एकूण 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये हत्येच्या गुन्ह्यांचा समावेश असून, खंडणी उकळणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. 2003 मध्ये त्याला तडीपारही करण्यात आले होते. राज्यात आघाडी सरकार सत्तेत असताना बोडकेने अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर सभेत प्रवेश केला होता. मात्र, माध्यमातून त्यावर टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीने एकाच दिवसात बोडकेला पक्षातून काढलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बोडकेने त्यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

नंबर 2 वर आहे निलेश घायवळ

निलेश घायवळ आणि गजाजन मारणे एकमेकांचे कट्टर दुश्मन. या दोघांच्या दुश्मनीमध्ये पुण्यात कितीतर गॅंगस्टर्सची हत्या झली. निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत. त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत. गजानन मारणे आणि घायवळ टोळीयुद्धांमध्ये 2010 मध्ये दत्तवाडी परिसरात निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खून केला होता. या खटल्यात फेब्रुवारी 2019 मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती. 2021 मध्ये पुणे शहर पोलिसांनी गॅंगस्टर निलेश घायवळला मोक्याच्या गुन्ह्यात अटक केली.

नंबर 1 वर असलेलं नाव आहे गजानन मारणे म्हणजेच गजा मारणे…

पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वातला शेहेनशहा म्हणजे गजा मारणे. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजाला 2014 पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तब्बल सात वर्षांनंतर गजाची सुटका झालेली. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेची मिरवणूक काढण्यात आलेली. यानंतर सुद्धा त्याचं गुन्ह्यांचं सत्र सुरुच होतं.

गजा मारणे पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. त्याने पुण्यातून पलायन करुन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला मेढा पोलिसांनी 6 मार्च रोजी अटक केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT