गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ अन् अल्पवयीन मुलासह एकाला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

gautami patil costume change video viral police arrested two people
gautami patil costume change video viral police arrested two people
social share
google news

इम्तियाज मुजावर, सातारा : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलची (Gautami Patil) क्रेझ महाराष्ट्रात वाढत चालली आहे. याच गौतमी पाटीलचा काहीच दिवसांपूर्वी कपडे बदलतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई करून अल्पवयीन आरोपीसह एकाला अटक केली आहे. अटकेनंतर विमातनळ पोलिसांनी आरोपींवर विनयभंग व आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे.(gautami patil costume change video viral police arrested two people one minor)

ADVERTISEMENT

24 फेब्रुवारीला पुण्यातील एका कार्यक्रमावेळी गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कपडे बदलतानाचा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. यावेळी नेहमी गौतमी पाटीवर टीका करणाऱ्यांनी तिच्या बाजूने उभे राहत संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जात होता.

हे ही वाचा : शारीरिक संबंध ठेवून… महिला पोलीसच करायची भयंकर कृत्य

गौतमी पाटीलचा (Gautami Patil) व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आता पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे.याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर आरोपींना पकडण्यात यश आले आहे. एका अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदारानेच तिचा तो व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. तांत्रिक तपासानुसार पोलीस अहमदनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलापर्यंत पोहचले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील भरतगाव वाडी येथून आयुष कणसे देखील ताब्यात घेतले होते. यावेळी चौकशीक त्याने गुन्ह्याची कबूली दिली होती.दरम्यान, तपासात हा व्हिडीओ यवत परिसरातील एका कार्यक्रमदरम्यान काढल्याचा संशय आहे.

हे वाचलं का?

आरोपींचा खळबळजनक खुलासा

विमानतळ पोलिसांनी गौतमीच्या (Gautami Patil) त्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अल्पवयीन मुलांसह दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संबंधित मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी तिच्याच नावाचे बनावट खाते तयार करून कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आयुष अमृत कणसे (वय 21, रा. भरतगाव वाडी, ता. सातारा) या आरोपीला अटक केली. या आरोपीसह एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींवर विमातनळ पोलीस ठाण्यात विनयभंग व आयटी अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा : शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT