Guru Waghamare : मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली नावं, पण गर्लफ्रेंडनेच काढला काटा, Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

guru waghmare murder story update police arrested girl friend mumbai spa murder story worli
पोलिसांनी गुरु वाघमारेच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडला अटक केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुरु वाघमारे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

point

गुरु वाघमारेची गर्लफ्रेंड मेरी जोसेफला अटक

point

मेरीला गुरूच्या हत्येच्या कटाची माहिती होती

Mumbai Spa Murder Case : मुंबईतील वरळीच्या  (Worli Spa)स्पा सेंटरमध्ये झालेल्या गुरू वाघमारे (Guru Waghmare) या हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गुरू वाघमारेने गजनी सिनेमाप्रमाने 22 शत्रुंची नावं आपल्या मांडीवर गोंदवली होती. पण त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि लाडक्या गर्लफ्रेंडचाच या हत्या प्रकरणात हात असल्याची बाब समोर आली आहे. म्हणूनच पोलिसांनी गुरु वाघमारेच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडला (Girl Friend)  अटक केली आहे.  (guru waghmare murder story update police arrested girl friend mumbai spa murder story worli) 

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिसांनी गुरु वाघमारेची गर्लफ्रेंड मेरी जोसेफला अटक केली आहे.  23 जुलैला हत्येच्या रात्री गुरू वाघमारेची गर्लफ्रेंड त्याच्यासोबत होती. मेरी आणि गुरू हे वरळीमधील स्पा सेंटरमध्ये रात्री 1 वाजता आले होते. विशेष म्हणजे मेरीला गुरूच्या हत्येच्या कटाची माहिती असताना देखील तिने गुरुला स्पामध्ये बोलावल्याचा दावा पोलिसांना केला आहे. मेरीने गुरु वाघमारेचे लोकेशन देखील आरोपींसोबत शेअर केल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. 

हे ही वाचा : Yashashree Shinde : ऑफिसला गेलेल्या यशश्रीचा मृतदेहच सापडला! चेहरा, गुप्तांगावर...

तसेच या कटात सहभागी असलेला स्पा मॅनेजर शमशाद अन्सारी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. स्पामध्ये बसवलेले सीसीटीव्ही डिस्कनेक्ट केल्याचा आरोप स्पा मालकावर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान गुरु वाघमारेने आपल्या जीवाला धोका असल्याच्या भीतीने 22 शत्रूंची नावे आपल्या दोन्ही पायावर आणि पाठीवर गोंदवली होती. गुरु वाघमारेच्या हत्येनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. संतोष शेरेकर, फिरोझ अन्सारी आणि शाकीब अन्सारी या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. 

दोन कथित हल्लेखोरांपैकी एकाने गुटखा खरेदी करण्यासाठी 70 रुपयांचे युपीआय पेमेंट केले होते. यावरून पोलिसांनी या तीन आरोपीचा छडा लावत त्यांना अटक केली. आता या प्रकरणात पोलिसांनी गुरु वाघमारेची गर्लफ्रेंड मेरी जोसेफलाही अटक केली.  

ADVERTISEMENT

असा रचला कट 

मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे हा वरळी नाका येथे असलेल्या स्पामध्ये नेहमी जायचा. हत्येच्या दिवशी देखील गुरु  स्पामध्ये गेलेला, त्यावेळी त्याच्या 21 वर्षीय मैत्रिणीने पार्टीची मागणी केली. यानंतर पाच जणांचा ग्रुप सायनमधील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास ते सर्व हॉटेलमध्ये पार्टी करून स्पामध्ये परतले. काही वेळाने तिघेही तेथून निघून गेले, तर वाघमारे व त्याची मैत्रीण तिथेच थांबल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे दोन तासांनंतर दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी स्पामध्ये येऊन वाघमारे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हत्येची माहिती पहाटे अडीच वाजता पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : IAS Coaching : UPSC कोचिंग सेंटरमध्ये 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, घटना घडली कशी?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT