Kalyan : लव्ह, सेक्स आणि गर्भपात…, BJP च्या माजी नगरसेवकावर गुन्हा

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

kalyan crime news rape case against former bjp corporator kolshewadi police shocking crime news
kalyan crime news rape case against former bjp corporator kolshewadi police shocking crime news
social share
google news

Kalyan News : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजपच्या माजी नगरसेवकाने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. मनोज राय असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. त्याने महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता आणि तिला जबरदस्ती गर्भपात करण्यास देखील भाग पाडले होते. या प्रकरणी आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मनोज रायवर (Manoj Ray) बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोज राय हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. (kalyan crime news rape case against former bjp corporator kolshewadi police shocking crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पुर्वेत राहणाऱ्या 30 वर्षीय पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहेत. या तक्रारीत पीडितेने लग्नाचे आमीष दाखवून माजी नगरसेवक मनोज रायने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याने तिला चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप केला आहे.

हे ही वाचा : Rajya Sabha election : सुनील तटकरेंना राज्यसभा, भाजपचा रायगडसाठी प्लॅन?

दरम्यान पीडितेने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर आरोपी माजी नगरसेवकाने तिला धमकी देऊन शिविगाळ करत तिला बेदम मारहाण देखील केली होती. आरोपीच्या या धमक्या आणि मारहाणीनंतर पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या पीडित महिलेने मनोज राय विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मनोज राय यांच्याविरोधात कलम 376(2)एन), 323,504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बिल्डर, व्यावसायिक आणि भाजपचे माजी नगरसेवक असलेले मनोज राय कल्याण पूर्वेतून आमदार होण्याचे स्वप्न पाहत होते. मनोज राय हे आमदार गणपत गायकवाड आणि मंत्री कपिल पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान कोळसेवाडीत गुन्हा दाखल झाल्यापासून मनोज राय हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : “आता तुम्ही अतिरेक्यांना शेतकरी समजायला लागलात”, ठाकरेंचा मोदींवर घणाघात

    follow whatsapp

    ADVERTISEMENT