Crime : पाच वर्षीय मुलीला गुप्तांगाजवळ दिले गरम चटके, कोल्हापूरात सावत्र आईचं राक्षसी कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

kolhapur crime news five year old girl hot flashes all over the body by stepmother shocking story
पाच वर्षीय मुलीला उलथन्याने शरीरभर दिलं चटके
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाच वर्षीय मुलीला उलथन्याने शरीरभर दिलं चटके

point

सावत्र आईचं मुलीसोबतर भंयकर कृत्य

point

सावत्र आईवर गुन्हा दाखल

Kolhapur Crime News : दिपक सुर्यवंशी, कोल्हापूर : कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका सावत्र आईने पाच वर्षीय मुलीला उलथन्याने शरीरभर चटके दिल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासरवाडी गावात ही घटना घडली. या प्रकरणी शुभम मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा मगरे हिच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पूजा मगरे या सावत्र आईला ताब्यात घेतले आहे. (kolhapur crime news five year old girl hot flashes all over the body by stepmother shocking story) 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील कासरवाडी गांव इथं मूळचे जालना जिल्ह्यातील शुभम मगरे हा पत्नी पूजा आणि पाच वर्षीय सावत्र मुलगी राणी यांच्यासह कासारवाडी भाड्याच्या घरात राहण्यास आहे. शुभम आणि पूजा यांचा हा विवाह दुसरा आहे. पहिल्या पत्नीपासून शुभम यांना एक मुलगी आहे. ही मुलगी शुभम यांच्याकडेच राहावयास आहे. दरम्यान काल शुभम मगरे हे कामानिमित्त बाहेर गेले असताना ही घटना घडली आहे. 

हे ही वाचा : Rohit Pawar : ''जरांगेंना रोहित पवार, टोपेंनी आंदोलनाला बसवले'', भुजबळांच्या आरोपांवर शरद पवार गटाचं आव्हान

त्याचं झालं असं की सावत्र मुलीने अंथरूणात लघूशंका केली होती. त्यामुळे बिछाना ओला झाला होता. याच कारणामुळे पुजा मगरे या संतापल्या होत्या. त्यामुळेच पुजा मगरे यांनी मुलीच्या गालावर, गळ्यावर, ओठावर आणि गुप्तांगाच्या बाजूला उलथन्याने गरम चटके दिले होते. या घटनेनंतर चिमुकलीच्या तोंडावर भाजल्याचे डाग होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला शरीरभर खूप ठिकाणी जखमा झाल्या होत्या. मुलगी लहान असल्यामुळे झालेल्या जखमांचे गांभीर्य तिच्या लक्षात आले नाही. तिच्या जखमा पाहून शेजारच्यांनी तिची विचारपूस केली. तरीही चिमुकली हसत -खेळत होती. गावातील सरपंचाला याबाबत कळताच त्यांना वडिलांना जाब विचारला. त्यानंतर मुलीचे वडील शुभम मगरे याने शिरोली पोलिसात तक्रार दिल्याने सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : Eknath Shinde : '...तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू', धाराशीवमध्ये शिंदे काय म्हणाले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT