Kopardi Rape Case : कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीची येरवडा कारागृहातच आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kopardi accused jitendra shinde yerwada jail suicide
Kopardi accused jitendra shinde yerwada jail suicide
social share
google news

Kopardi Rape Case : राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी हत्याकांडाबाबत आज एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळकरी मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा भोग असलेला आरोपी जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) याने गळफास घेऊन येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. येरवडा कारागृहातच आरोपीने आत्महत्या केल्याने प्रशासनावर आता बोट ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता चौकशी कशी होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ADVERTISEMENT

असं घडलं होतं प्रकरण

अहमदनगर जिल्ह्यात 13 जुलै 2016 रोजी कोपर्डीमधील तुकाई लवण वस्ती परिसरात शाळकरी मुलगी आजोबांच्या घरी गेली होती. त्यावेळी आजोबांच्या घरातून परतत असताना जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडवून शेजारी असलेल्या जंगात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर तिची निघृण हत्याही केली. त्यानंतर जितेंद्र शिंदेसह संतोष भवाळ आणि नितिन भैलुमेला अटक केली होती. त्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आली होती. मात्र आता आरोपीनेच आत्महत्या केल्याने आता सगळ्यानाच धक्का बसला आहे.

हे ही वाचा >> Crime: महिलेचं अपहरण करून निर्जनस्थळी नेले, नग्न होण्यास भाग पाडलं आणि…,डोंबिवलीत काय घडलं?

पाच वर्षापासून तुरुंगात

अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे गेल्या पाच वर्षापासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याच्यासोबत दोन आरोपीही शिक्षा भोगत होते. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी कोपर्डीत वेळोवेळी आंदोलनही करण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रशासनालाही धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

अन् न्यायालयानं दोषी ठरवलं

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये अत्याचार करुन मुलीची हत्या करण्यात आल्यानंतर काही तासातच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अहमदनगर विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर आरोपींच्या फाशीवर शिक्का मोर्तब करण्यासाठी सरकारकडून हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर आरोपी भवाळने हे मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आणि हे प्रकरण औरंगाबादहून मुंबईला वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यामुळे हे प्रकरण मुंबईला वर्गही केले होते. मात्र या खटल्याची सुनावणी प्रलंबित असल्याने तिन्ही आरोपींना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते.

हे ही वाचा >> Maratha Reservation : आरक्षणाचा पेच, अजित पवारांनी सांगितलं कसा काढणार मार्ग?

प्रशासनात खळबळ

कोपर्डी प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यभरात आरोपींना फाशी देण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींच्या शिक्षेकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. आता मुख्य आरोपीनेच आत्महत्या केल्यामुळे प्रशासनावर आता टीकेचे झोड उठली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT