Crime : लव्ह, सेक्स आणि धोका! ब्रेकअपनंतर अश्लील व्हिडीओ बनवून..,तरूणीसोबत काय घडलं?
एकाच वर्गात शिकत असताना दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. प्रियकर आणि प्रेयसी दोघं एकमेकांच्या प्रेमात असतानाच अचानक काही दिवसांनी वादाला सुरुवात झाली. वाद होताच प्रेयसीने ब्रेकअप केले आणि प्रियकराबरोबरचे संबंध तोडले. त्यामुळे प्रियकराने तिचा बदल घ्यायचं ठरवलं आणि तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी करण्यास सुरुवात केली.
ADVERTISEMENT

Crime News : झारखंडच्या (Jharkhand) चाईबासामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत प्रेम (Love) आहे, वासना (Sex) आहे आणि ज्याच्यावर प्रेम केले आहे, त्या माणसाचा केलेला विश्वासघातही आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा केली जात आहे. ज्या मुलीवर प्रेम केले होते, त्या दोघांचं कोणत्या तरी एका कारणामुळे ब्रेकअप (Breakup) झालं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांचे संबंध तोडले. दोघांनी संबंध तोडल्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली.
मैत्रिणीच्या अब्रुचे धिंडवडे
आपली प्रेयसी आपल्यापासून दूर गेल्याचं दुःख आणि त्याचं त्याला वाईट वाटलं होते. आपल्याबरोबर संबंध तोडल्याचा त्याचा त्याला राग आला होता. त्यामुळे त्याने मैत्रिणीच्या अब्रुचे धिंडवडे काढले. प्रेयसीने आपल्याला नाकारल्याचे जसं त्याला दुःख झालं होते, त्याचा त्याला रागही आला होता. त्यामुळे त्याने आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयसीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
हे ही वाचा >>Elvish Yadav: रेव्ह पार्टीमध्ये का नेतात नाग, विषारी साप अन् नशा.. काय आहे कनेक्शन?
अश्लील व्हिडीओ व्हायरल
मुलीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियामधून व्हायरल झाल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनीही ठोस कारवाईला सुरुवात केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला होता. त्याच्याबरोबर त्याच्या मित्रानेही मुलीचे ते अश्लील व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यामुळे पोलिसांनी मित्रांवरही कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
प्रेयसीचा घेतला बदला
चाईबासामधील किरुबुरूमध्ये प्रेयसीने संबंध तोडल्याने तिचे बनवलेले अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या माजी प्रियकराच्या 3 मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणी ‘त्या’ प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचा बदला घेण्यासाठी माजी प्रियकराने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून त्याने ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याची तक्रार प्रेयसीने दिली आहे. या प्रकारामुळे तिला मानसिक धक्का बसला असून बदनामी झाल्यामुळे ती आत्महत्या करण्याचा विचार करील म्हणून पोलिसांनी तिची समजूत काढून संबंधितांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे अश्वासन त्यांनी दिले आहे.