भावजयीचा दीरावर जीव जडला, पतीची हत्या केल्यानंतर हॉटेलमध्ये काम, गुपचूप टाकलेला डाव 6 महिन्यांनी कसा झाला उघड?

मुंबई तक

Love Story and Crime News : भावजयीचा दीरावर जीव जडला, पतीची हत्या केल्यानंतर हॉटेलमध्ये काम, गुपचूप टाकलेला डाव कसा झाला उघड?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भावजयीचा दीरावर जीव जडला

point

पतीची हत्या केल्यानंतर हॉटेलमध्ये काम

Love Story and Crime News : भावजयचा तिच्या दीरावर जीव जडला आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध फुलले. दोघांमध्ये घराबाहेर सततच्या भेटी-गाठी होऊ लागल्या. मात्र, दोघांचं प्रेमप्रकरण असल्याचं पतीला समजलं आणि त्यानंतर मोठा वाद झाला. या वादात दिनेश अवस्थी यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. पूनम आणि मनोज अवस्थी यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले होते. मात्र, दिनेश अवस्थीमध्ये येत असल्याने त्याचा काटा काढणे दोघांसाठी आवश्यक वाटू लागले. अखेर सहा महिन्यांपूर्वी मिळून दीर-भावजयने मिळून दिनेश अवस्थीची हत्या केली होती. अखेर हे प्रकरण उलगडा झाला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कानपूरमधून समोर आली आहे. 

संपूर्ण प्रकरण काय?

कानपूरमधील खरेसा गावात राहणाऱ्या दिनेश अवस्थी यांचा एप्रिल महिन्यात खून करण्यात आला होता. पोलिस तपासात उघड झाले की, दिनेश यांची पत्नी पूनम आणि त्याच्या भावाने म्हणजेच मनोज अवस्थीने मिळून दिनेशचा खून केला आणि दोघे फरार झाले. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी दोघांनाही अटक करण्यात आली. दोघांवर 25-25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मनोजवर याआधीच दोन गुन्हे नोंदलेले होते, हा तिसरा खुनाचा गुन्हा आहे. तर पूनमवर हा पहिलाच गुन्हा आहे. तपासात असे समोर आले की, पूनम आणि मनोज यांच्यात प्रेमसंबंध होते, याची माहिती दिनेशला मिळाली होती. त्यानंतर या दोघांनी मिळून त्याची हत्या केली.

हेही वाचा : निलेश घायवळच्या पुण्यातील घराची पोलिसांकडून झाडाझडती, काय काय सापडलं?

आरोपी कसे पकडले गेले?

हत्या केल्यानंतर पूनम आणि मनोज गाव सोडून फरार झाले. दरम्यान पूनमने बागेश्वर धाम येथून आपल्या एका नातलगाला फोन केला, त्यावरून पोलिसांनी तिचे लोकेशन ट्रेस केले. त्यानंतर कळाले की हे दोघे मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे लपून बसले आहेत. पोलिसांनी तेथे धाड टाकून दोघांनाही ताब्यात घेतले.

हे वाचलं का?

    follow whatsapp