आधी तरुणाला बेदम मारहाण अन् नंतर नग्नावस्थेत गावभर फिरवलं, कारण...

मुंबई तक

गुंडांनी एका तरुणाला विचित्र पद्धतीची शिक्षा दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आधी पीडित तरुणाला मारहाण केली, नंतर त्याचे कपडे काढून त्याला पूर्ण गावातून फिरवलं.

ADVERTISEMENT

कपडे काढून नग्नावस्थेत फिरवलं...
कपडे काढून नग्नावस्थेत फिरवलं...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आधी तरुणाला बेदम मारहाण अन् नंतर नग्नावस्थेत फिरवलं...

point

'त्या' तरुणासोबत नेमकं काय घडलं?

Crime News: मध्य प्रदेशातील मऊगंज येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे गुंडांनी एका तरुणाला विचित्र पद्धतीची शिक्षा दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आधी पीडित तरुणाला मारहाण केली, नंतर त्याचे कपडे काढून त्याला पूर्ण गावातून फिरवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित घटनेनंतर पोलिसांनी चार तरुणांना अटक केल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील कोनी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून प्रकरणातील आरोपींमध्ये अनिल कुशवाह, लालमणी कुशवाह, सोहन कुशवाह आणि सुनील कुशवाह यांचा समावेश असल्याची माहिती आहे. 

चार तरुणांनी हल्ला केला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सुमारे एक महिना जुना आहे. व्हिडिओमधील पीडित व्यक्तीचं नाव मनीष यादव असून तो जिल्ह्यातील हनुमान पोलीस स्टेशन हद्दीतील कोनी गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे. गावातील कुशवाहा समाजातील चार तरुणांनी मनीषवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:  पाझर तलावात पोहण्यासाठी गेला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने 12 वर्षीय तरुण बुडाला; जालन्यातील दुर्दैवी घटना

कपडे काढून बेदम मारहाण

पीडित मनीषच्या म्हणण्यानुसार, कर्जाच्या व्यवहारावरून झालेल्या वादामुळे आरोपींनी त्याचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांच्या तपासातून, या घटनेबाबत एक वेगळीच बाब समोर आली आहे. आरोपी गुंडांनी आधी पीडित तरुणाला मारहाण केली आणि नंतर दारूसाठी 1200 रुपये मागितलं असल्याचं म्हटलं जात आहे. 

नग्न अवस्थेत परिसरात फिरवलं

पीडित तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला नग्न अवस्थेत परिसरात फिरवलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये बरेट तरुण एका तरुणाला नग्न अवस्थेत फिरवत असल्याचं दिसून येत आहे. तो नग्न पुरूष आरोपीच्या आज्ञेनुसार डोकं टेकवून सरळ चालताना दिसत आहे आणि घटनेतील पीडित तरुण घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp