पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी बॅगमध्ये काय आणलेलं? समोर आली मोठी माहिती
Pahalgam Attack Terrorists Bags: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT

Pahalgam Attack Terrorists: पहलगाम: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुप्तचर संस्थांनी केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की हल्लेखोर पूर्णपणे तयारी करून आले होते आणि त्यांच्या बॅगमध्ये अशा अनेक गोष्टी होत्या ज्या त्यांच्या धोकादायक हेतूंकडे लक्ष वेधत होत्या.
दहशतवाद्यांच्या बॅगांमध्ये काय होते?
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या पाठीवर असलेल्या पिशव्यांमधून सुकामेवा, औषधे आणि संचार उपकरणे होती. यावरून असे दिसून येते की, दहशतवादी बराच काळ लपून हल्ला करण्याची योजना करुन आले होते.
दहशतवाद्यांसह स्थानिकांची मदत
या हल्ल्यात 5 ते 6 परदेशी दहशतवादी सहभागी असल्याचेही तपासात समोर आले आहे, जे काही काळ जंगलात लपून बसले होते. त्यांना स्थानिक लोकांकडूनही मदत मिळत होती, ज्यांनी त्याला पहलगाम परिसराची रेकी करण्यात मदत केली. यापैकी 2 पाकिस्तानी दहशतवादी पश्तो भाषा बोलत होते, तर 2 स्थानिक दहशतवादी आदिल आणि आसिफ हे बिजभेरा आणि त्राल येथील रहिवासी होते.
हे ही वाचा>> पहलगाम दहशतवादी हल्ल्याची 'ही' आहे Inside स्टोरी, तुम्हीही जाल हादरून!
दहशतवाद्यांच्या शरीरावर कॅमेरे, 26/11 सारखा हल्ला!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एक किंवा दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या शरीरावर कॅमेरे लावले होते, जेणेकरून संपूर्ण हल्ला रेकॉर्ड करता येईल. गुप्तचर संस्थांनुसार, पहलगाममधील हा दहशतवादी हल्ला 2008 मध्ये मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या धर्तीवर करण्यात आला होता.