Crime: मेहुणीच्या प्रेमात झालेला वेडा, दाजीने केलं भलतंच काही..
मेहुण्याच्या घरात मेहुणी राहण्यासाठी आली होती, मात्र काही दिवसांनी दाजीच मेहुणीच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याने मेहुणीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र मेहुणीने लग्नाला नकार दिला आणि त्याने मित्रांना सांगून मेहुणीचाच काटा काढला.
ADVERTISEMENT

Murder News: सहारनपूरमधील चालाकपूरमध्ये एका विवाहित मेहुण्याने आपल्याच मेहूणीची हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून मेहुणा आपल्याच मेहुणीच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे तो मेहुणीबरोबर लग्न करायच्याही तयारीत होता. मात्र लग्नाला नकार मिळताच त्याने प्लॅनिंग करुन मेहुणीची हत्या केली. या घटनेमुळे कुटुंबीयांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. मेहुण्याने मेहुणीची हत्या केल्यानंतर आता 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारंही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मेहुण्याच्या मित्रांनी केला घात
चालाकपूरमध्ये राहत असलेल्या मुशर्रफ यांच्या घरात घुसून काही जणांनी गोळ्या झाडून तरुणीची हत्या केली आहे. ही मुलगी चालकपूरमध्ये राहत होती. मात्र 24 ऑक्टोबरच्या रात्री मेहुण्याच्या मित्रांनी त्या मुलीच्या घरात घुसून तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली आहे.
मेहुणीच्या हत्येसाठी लाखोंची सुपारी
मुलीच्या हत्येनंतर मेहुणा तौकीर आणि त्याचा मित्र रेहमान या संशयितांविरोधात बडकाला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तौकीरची चौकशी करून पोलिसांनी गुन्हेगार शोएब, नौशाद, हुसेन व अलसमद, हसीन या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या रेहमान आणि त्याचे साथीदार तालिब आणि पप्पू मात्र फरार झाले आहेत. या प्रकरणात आरोपींकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे, चार मोबाईल फोन आणि तीन दुचाकीही जप्त केल्या आहेत.
हे ही वाचा >> Maratha Reservation साठी काँग्रेस आमदाराने स्वतःवरच झाडलेली गोळी, 1980 ची घटना काय?
हत्येचं पूर्ण प्लॅनिंग
मेहुणीची हत्या करण्यासाठी मेहुण्याने पूर्ण प्लॅनिंग केले होते. तिची हत्या करण्याआधी त्याने आपल्या मेहुणीला व्हिडीओ कॉलही केला होता. त्यानंतर त्याने शोएबला मेहुणीच्या घरातील माहिती सांगितली होती. मेहुणी घरात कुठे आहे, ती कुठे झोपली आहे. हे सांगताना त्याने तिच्या ड्रेसचा कलरही त्याला सांगितला होता.