Mumbai Crime : चित्रपटात काम देतो म्हणून मुलीला मुंबईत आणले, अंधेरीतील हॉटेलमध्ये…
Mumbai Crime News : पीडित तरुणी गुजरातची रहिवासी आहे. ती व्हिडीओचे रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायची. यानंतर पीडित मुलीच्या काकांनी 13 डिसेंबरला तिची साजिद खानशी भेट घडवून आणली. साजिद मुलीला अभिनय शिकवेल आणि तिला चित्रपटात काम मिळेल, अशी आशा त्यांना होती.
ADVERTISEMENT

– दीपेश त्रिपाठी, मुंबई
Mumbai crime news in marathi : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्वतःला गुजराती चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणवून घेणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. साजिद खान, असे या आरोपीचे नाव आहे. साजिदवर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी गुजरातची रहिवासी आहे. ती रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायची. तिच्या कलागुण बघून पीडित मुलीच्या काकांनी 13 डिसेंबरला तिची साजिद खानशी भेट घडवून आणली. साजिद मुलीला अभिनय शिकवेल आणि तिला चित्रपटात काम मिळेल, अशी आशा त्यांना होती.
पीडितेला गुजरातमधून आणले मुंबईत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबाचा साजिदवर विश्वास होता, त्याचा फायदा घेत साजिदने पीडितेला २४ डिसेंबर रोजी मुंबईत आणले आणि मुंबईतील अंधेरी येथील हॉटेलमध्ये नेले. 25 डिसेंबर रोजी सकाळी साजिदने तरुणीवर जबरदस्ती केली.