'आता आम्ही एकत्र काम करू...'; हत्येपूर्वी FB लाईव्हवर अभिषेक आणि मॉरिस यांच्यात नेमकी कोणती चर्चा?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहे मॉरिस, ज्याने आधी खून केला आणि नंतर आत्महत्या केली?

point

लाईव्ह दरम्यान अभिषेक आणि मॉरिस काय बोलत होते?

point

मुंबई पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

Dahisar Firing  Abhishek Ghosalkar : मुंबईत (Mumbai) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरूवारी (08 जानेवारी) गोळीबार झाला. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. हत्येपूर्वी दोघांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केले होते. गोळीबाराचा हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Murder on Facebook live in Mumbai Mauris and Abhishek Ghoshalkar both of them were live on facebook during incident)

ADVERTISEMENT

ही घटना घडली तेव्हा दोघेही सोशल मीडियावर लाईव्ह होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असतानाच आणखी काही गोष्टीही समोर आल्या आहेत.

कोण आहे मॉरिस, ज्याने आधी हत्या करून नंतर केली आत्महत्या?

मॉरिस नोरोन्हा हा बोरिवली पश्चिम आयसी कॉलनीत राहत होता. मॉरिस स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवत होता आणि त्याला निवडणूक लढवायची होती. राजकारण्यांसोबतचे अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिषेक आणि मॉरिस यांचे ऑफिस एकमेकांच्या शेजारी होते. मॉरिसने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूकही लढवली होती. 

हे वाचलं का?

येथील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक राजकारणावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ सुरू होती. हत्येचे कारणही परस्पर वैमनस्यातून निघाले आहे, मात्र मॉरिसनेही आत्महत्या का केली हा ही मोठा प्रश्न आहे.

मॉरिसवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल आहेत. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप  मॉरिसवर आहे.  मॉरिसने महिलेला धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.  पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोपही  मॉरिस त्याच्यावर आहे.  

ADVERTISEMENT

FB Live मध्ये काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या फेसबुक लाईव्हच्या व्हिडीओमध्ये अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस दोघेही एकत्र बसलेले दिसत आहेत. अभिषेकने निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा तर मॉरिस टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला होता. हे दोघेही एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसराच्या भल्यासाठी त्यांचे परस्पर वाद संपवून ते एकत्र आल्याचे फेसबुक लाईव्हवरून स्पष्ट करण्यात आले.

ADVERTISEMENT

लाईव्ह दरम्यान अभिषेक आणि मॉरिस काय बोलत होते?


समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मॉरिस उठून म्हणतो की, 'आम्ही IC कॉलनीच्या भल्यासाठी कसे काम करू शकतो यावर आम्ही चर्चा करतोय. बोलण्यासारखे फार काही नाही, अभिषेक दोन शब्द सांगतील.' यानंतर अभिषेक बोलू लागले. ते म्हणाले, 'आमच्यात अनेक गैरसमज झाले आहेत, पण आता आम्ही लोकांच्या भल्यासाठी एकत्र काम करू. गरीब आणि गरजू लोकांसाठी चांगले काम करायचे आहे, म्हणून ही सुरुवात आहे. अजून चांगले काम करायचे आहे.'

असे म्हणत ते हसत हसत उठतात तेवढ्यात त्यांच्यावर गोळीबार झाला. काही सेकंदापूर्वीही अभिषेक यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्यासोबत असं काही होईल. 

मुंबई पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांत एक एफआयआर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येसाठी आणि दुसरी एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) मॉरिस नोरोन्हा यांच्या आत्महत्येसाठी असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT