Nagpur Crime : IAS, IPS होण्याचं होतं स्वप्न, पण…; अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

योगेश पांडे

ADVERTISEMENT

nagpur crime story food and drug administration inspector commit suicide crime news
nagpur crime story food and drug administration inspector commit suicide crime news
social share
google news

Nagpur Crime News : नागपूरातून (Nagpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका एफडीएच्या अधिकाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुभम कांबळे (25) असे या तरूणाचे नाव आहे. हा तरूण अन्न व औषध प्रशासन विभागात (Drug Administration Inspector) निरीक्षक या पदावर कार्यरत होता. या तरूण अधिकाऱ्याने हॉटेलमध्ये जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागपूराच एकच खळबळ माजली आहे. (nagpur crime story food and drug administration inspector commit suicide crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचा परभणीचा असलेला शुभम कांबळे (25) हा तरूण नागपूरात मित्राला भेटण्यासाठी आला होता. यासाठी त्याने हॉटेलमध्ये एक खोली बुक देखील केली होती. या दरम्यान 27 नोव्हेंबरच्या सकाळी हॉटेलच्या लँडलाईनवर शुभमसाठी एक कॉल आला होता. मॅनेजरने रूमबॉयला याबाबतची कल्पना देण्यासाठी कांबळे यांच्या रूमवर पाठवले होते. मात्र दार अनेकदा ठोठावून आणि आवाज देऊन देखील आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने थेट पोलिसांना या घटनेची कल्पना दिली होती.

हे ही वाचा : Tunnel Rescue : 41 मजूरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारा ‘देवदूत’, कोण आहेत Arnold Dix?

पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन दार उघडताच शुभम रूममध्ये बेशुद्धा अवस्थेत पडला होता. तर रूममध्ये चार-पाच रसायनांच्या बॉटलही देखील आढळून आल्या आणि घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये शुभम कांबळेने आत्महत्ये मागचं कारण सांगितले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्राथमिक माहितीनूसार शुभमने चार ते पाच बॉटल्समधील रसायनांचे मिश्रण करून रूममध्येच विषारी द्रव्य तयार केले होते. हेच विषारी द्रव्य प्राषन करून त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. तसेच सुसाईड नोटमध्ये, मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. मी आयएएस आणि आयपीएस होऊ शकलो नाही. याची मला खंत असल्याने त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : Deepak Kesarkar अचानक का गेले नारायण राणेंच्या घरी? ‘त्या’ बॅगेतून राणेंना काय दिलं?

दरम्यान पोलिसांनी शुभम कांबळेला तत्काळ उपचारासाठी मेयो रूग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. त्यामुळे आता गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT