प्रसिद्ध महिला युट्यूबर्सची दादागिरी! शेजाऱ्यांसोबत काय केलं बघा; अश्लील कंटेंटसाठी खाल्ली आहे जेलची हवा..
अश्लील कंटेंट प्रसिद्ध केल्याबद्दल तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या प्रसिद्ध युट्यूबर परी हिचा अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तिने आपल्या शेजाऱ्यांना इतकी मारहाण केली की त्यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर काय घडलं, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रसिद्ध महिला युट्यूबर्सची दादागिरी!
शेजाऱ्यांसोबत काय केलं बघा
अश्लील कंटेंटसाठी खाल्ली आहे जेलची हवा..
Crime News : सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त आणि अश्लील व्हिडिओंमुळे चर्चेत असणाऱ्या महक आणि परी या युट्यूबर बहिणींचे हिंसक रूप पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मुलांच्या खेळातून सुरू झालेला वाद इतका वाढला की, महक आणि परी हातात दांडके घेऊन शेजाऱ्यांशी भिडल्या. या हाणामारीत महक-परीचे वडील सरफराज आणि दुसऱ्या बाजूचे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघी बहिणी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील आहेत.
असमोली पोलीस ठाण्याने महक आणि परीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महक, परी आणि शेजाऱ्यांमधील हाणामारीची ही घटना काही नवीन नाही. यापूर्वीही या युट्यूबर बहिणी मुरादाबाद जिल्ह्यात एका तरुणाला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होता. महक आणि परीच्या सातत्याने दादागिरीच्या प्रतिमा समोर येत असूनही पोलीस अद्याप त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करू शकलेले नाहीत.
अश्लील मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा
वास्तविक, असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहबाजपुर कला गावातील रहिवासी असलेल्या चर्चित युट्यूबर महक-परीवर सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी अमरोहा आणि मुरादाबाद जिल्ह्यात महक-परीने मारहाण केल्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हे ही वाचा : शाळा व्यवस्थापकाचे अश्लील व्हिडिओ आणि लाखो रुपयांची देवाणघेवाण, शिक्षिका आणि प्रियकर विद्यार्थ्याचा कारनामा; नेमकं काय घडलं?
महक, परी आणि शेजाऱ्यांमध्ये हाणामारी
आता पुन्हा असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहबाजपुर कलां गावात महक-परी आणि शेजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. मुलांसोबत खेळताना धाकट्या बहिणीशी वाद सुरू झाला, ज्याचे रूपांतर पुढे दोन्ही गटांतील लाठीकाठ्यांच्या हाणामारीत झाले. यादरम्यान महक-परीचे वडील सरफराज यांच्यासह दोन्ही बाजूंचे चार जण जखमी झाले.









