सारख्या तक्रारी, अभ्यासात लक्ष नाही… खोड्या करतो म्हणून बापाने पोटच्या लेकरालाच संपवलं!
Solapur Crime News : सोलापूरमध्ये एका व्यक्तीने त्याचाच मुलाचं रागाच्या भरात जीवन संपवलं आहे. शाळेतून येणाऱ्या तक्रारी, मुलाचं अभ्यासाकडे दुर्लक्ष, त्याचा खोडसाळपणा याला आरोपी वडील वैतागला होता. तो मुलावर नाराजही होता. मुलाच्या या सवयींना कंटाळून आरोपी वडिलाने आपल्याच पोटच्या लेकराची हत्या केली.
ADVERTISEMENT

Solapur Crime News : वडील आणि मुलाचे नाते खूप खास असते अगदी मित्रासारखे. मुलांच्या चुका सुधारण्यासाठी काही वडील समजावून सांगतात तर काही ओरडून किंवा धोपटून… शेवटी ते त्यांच्या भल्याचाच विचार करतात. पण, विचार करा जर एखाद्या बापाने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतला तर? सोलापूरमध्ये (Solapur) नुकतीच अशी धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याचाच मुलाचं रागाच्या भरात जीवन संपवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतून येणाऱ्या तक्रारी, मुलाचं अभ्यासाकडे दुर्लक्ष, त्याचा खोडसाळपणा याला आरोपी वडील वैतागला होता. तो मुलावर नाराजही होता. मुलाच्या या सवयींना कंटाळून आरोपी वडिलाने आपल्याच पोटच्या लेकराची हत्या केली.
वाचा : Rajya Sabha Election 2024 : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीप पाळावा लागणार?
काय आहे संपूर्ण घटना?
सोलापूर-तुळजापूर महामार्गाच्या सर्व्हिस रोडच्या नाल्याजवळ एका छोट्या मुलाचा मृतदेह पडलेला आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच जोडबावी पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलाला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. मात्र तेथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तपासावेळी पोलिसांनी मुलाची ओळख पटवली आणि तो भवानी पेठ, सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समजले.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असता, घटना घडली त्या रात्री मृत मुलगा घरातून निघून गेल्याचे समोर आले. 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती मात्र अद्याप मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरापासून ते मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याच्या मृत्यूला वडीलच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी विजयची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.