Thane Rave Party : एलएसडी, चरस घेऊन रेव्ह पार्टी; 12 तरुणी, 90 तरुणांना…

मुंबई तक

ADVERTISEMENT

90 men and 12 women detained while rave party was going on in Godbunder road in Kasarwadavli village in Thane.
90 men and 12 women detained while rave party was going on in Godbunder road in Kasarwadavli village in Thane.
social share
google news

– देव कोटक, विक्रांत चौहान (ठाणे)

Thane crime news : नव वर्षांच्या एक दिवस आधी कासारवडवली गावाजवळ सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावली. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा 12 तरुणी आणि 90 तरुणी अंमली पदार्थांचं सेवन करून नव वर्षांचं सेलिब्रेशन करताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी 100 पेक्षा जास्त जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. रेव्ह पार्टीत एलएसडी, चरस, गांजा, अल्कोहोल यासह इतर अंमली पदार्थ आढळून आले. (Thane Police raids rave party, arrests 100 people including 5 young women.)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली भागात घोडबंदर रोडवर असलेल्या एका खासगी प्लॉटमध्ये नव वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी रेव्ह पार्टी आयोजित केली गेली होती. 2 तरुणांनी ही पार्टी आयोजित केली होती. हे दोन्ही तरुण कळवा आणि डोबिंवलीत राहणारे असून, सुजल महादेव (वय 19) आणि तेजस कुबल (वय 23) अशी मुख्य आरोपींची नावे आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

माहिती मिळताच पोलिसांनी टाकली धाड

कासारवडवली गावाजवळ एका प्लॉटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा उपायुक्त शिवराज पाटील, एसीपी आणि युनिट पाच व युनिट दोन यांचा समावेश असलेल्या पथकाने रात्री 2 वाजता ही कारवाई केली.

हेही वाचा >> “भावी खासदार पोस्टर लावणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम”, फडणवीसांचा इच्छुक उमेदवारांना इशारा

पोलिसांनी रेव्ह पार्टी सुरु असलेल्या प्लॉटमध्ये धाड टाकली, तेव्हा अनेक तरुण अंमली पदार्थांचे सेवन करून नाच करत होते. रेव्ह पार्टीत नशेसाठी एलएसडी, चरस, गांजा तसेच मद्य आणण्यात आलेले होते.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?

गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत 100 तरुणांना ताब्यात घेतले. सर्व तरुण नशेत आढळून आले. पोलिसांनी 19 दुचाकी वाहनेही ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि ताब्यात घेतलेल्या तरुणांना वैद्यकीय चाचणीसाठी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT