धावपट्टीवरच भरधाव दोन विमानांनी घेतला पेट अन्…, 379 प्रवाशांचे झालं काय?
जपानमधील टोकियो हानेडा विमानतळावर दोन विमानांची धडक झाल्याने पेट घेतला. यावेळी विमानामध्ये 379 प्रवासी होते, मात्र प्रवाशांना आणि कर्माचाऱ्यांना सुखरूपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
ADVERTISEMENT

Japan Plane Fire : जपानमधील टोकियो हानेडा (Tokyo Haneda) विमानतळावर मंगळवारी 2 विमानांची टक्कर होऊन एका विमानाला भीषण आग लागली. दुर्घटनावेळी विमानामध्ये 379 प्रवासी होते, मात्र यावेळी सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. जपानी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर उतरत असताना दोन विमानांमध्ये टक्कर झाली. त्यावेळी एका विमानाला रनवेवरच आग लागली. ही दुर्घटना घडल्यानंतर सर्व रनवे बंद करण्यात आले. या दोन विमानांपैकी एक विमान हे जपान एअरलाइन्सचे होते तर दुसरे विमान तटरक्षक दलाचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
व्हिडीओ व्हायरल
जपानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ज्या विमानाला आग लागली होती, त्या विमानाने होक्काइडोमधून उड्डाण केले होते. न्यू चिटोस विमानतळावरून हे विमान चार वाजता निघाले होते, तर पावणे सहा वाजता ते विमान हानेडा विमानतळावर उतरणार होते. माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विमानाच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून विमानातील प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.
हे ही वाचा >> Lok Sabha 2024 : राम मंदिर ते मिशन लोकसभा; मोदी-शाहांची खास रणनीती, समजून घ्या 4 मुद्दे
बेपत्ता कर्मचारी सापडले
जपान टाइम्सने या दुर्घटनेची माहिती देताना सांगितले की, तटरक्षक दलाने सांगितले की, त्यांच्या एका विमानाची हानेडा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाशी टक्कर झाली. त्यावेळी तटरक्षक दलाच्या विमानात एकूण 40 जण होते. मात्र अपघातानंतर त्यातील पाच जण बेपत्ता होते, मात्र काही वेळानंतर ते सापडल्याचेही सांगण्यात आले.










