Crime : पत्नीच्या हत्येची 6 लाखांत दिली सुपारी, पण पतीचाच झाला ‘गेम’!
बुलंदशहर ककोड परिसरात घडलेल्या तेजपाल हत्याकांडप्रकरणी आता पोलीसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सुपारी घेणाऱ्या किलर्सना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

UP Murder Case : भारतात दिवसेंदिवस गुन्हेगारी वृत्ती वाढताना पाहायला मिळत आहे. कधी कुणाला लुटलं जात आहे तर कधी कुणाचा जीव घ्यायलाही मगे पुढे पाहिलं जात नाही. उत्तर प्रदेशमध्येही (Uttar Pradesh) गेल्या 2 आठवड्यांपूर्वी अशीच थरारक घटना घडली. बुलंदशहर ककोड परिसरात घडलेल्या तेजपाल हत्याकांडप्रकरणी (Murder Case) आता पोलीसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. (Uttar Pradesh bulandshahar Crime News Husband Gave Supari to kill Wife but Killers shooted him)
या प्रकरणी पोलिसांनी दोन सुपारी घेणाऱ्या किलर्सना अटक केली आहे. चौकशीत मृत झालेल्या तेजपालनेच पत्नीच्या हत्येची सुपारी या दोन आरोपींना दिल्याचे उघड झाले. पत्नीच्या हत्येसाठी निघालेल्या किलर्सचा प्लान बदलला आणि त्यांनी सुपारी देणाऱ्या तेजपालचीच हत्या केली.
वाचा: Rohit Pawar : अजित पवारांशीच पंगा! रोहित पवार म्हणाले, “टीका मी पचवून घेईन, पण…”
मृत तेजपालने पत्नीच्या हत्येची दिली होती सुपारी, मग काय घडलं?
गुरुवारी (30 नोव्बेंबर) एसपी सिटी/आयपीएस सुरेंद्रनाथ तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी ककोडच्या मोहल्ला कसाईबाडा येथील एका घरात तेजपालचा मृतदेह सापडला होता. मृताच्या पत्नीने अज्ञात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली.
पोलीस तपासादरम्यान बबली उर्फ बलराज आणि दीप सिंग या दोन आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना दुचाकीसह अटक केली. घटनास्थळी तपास केला असता आरोपी दीप सिंगच्या घरातून तेजपालच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल, तीन लाख रुपये आणि एक चावी जप्त करण्यात आली आहे.









