मुंबई हादरली! दिवसाढवळ्या गोळ्या झाडून महिलेची हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

women shot dead in mankhurd
women shot dead in mankhurd
social share
google news

Women shot dead in mankhurd :मुंबईत एका महिलेची दिवसाढवळ्या गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची हादरवून टाकणारी घटना घडलीय. मानखुर्दच्या इंदिरा नगर परीसरात शनिवारी ही धक्कादायक घटना घडलीय.या घटनेने शहर हादरलंय. फरजाना असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.दरम्यान घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे. (women shot dead in mankhurd two accuses absconding)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्दच्या इंदिरा नगर भागात शनिवारी फरजाना यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. घटनास्थळी राहणाऱ्या दोन कुटूंबियांमध्ये काही दिवसांपासून भांडणे सुरु होती. शनिवारी देखील त्या दोन कुटूंबियांमध्ये भांडणे झाली होती. याच भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने आपल्या मुलासह महिलेवर गोळी झाडून हत्या केली होती. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

हे ही वाचा : वासनांधांकडून मृतदेहावर बलात्कार… आई-वडील लावतायेत मुलींच्या कबरीला कुलूप!

सीसीटीव्हीत तुम्ही पाहू शकता, आरोपी भांडणे करून येतात. या भांडणानंतर मृत महिला फरजाना धावायचा प्रयत्न करत असते. या दरम्यान आरोपी बाप आणि मुलगा महिलेवर गोळी झाडून तिची हत्या करतात. या हत्येनंतर दोघे आरोप घटनास्थळावरून पळ काढतात. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल होतात. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटली आहे. सोनू सिंह (55 वर्ष) आणि मुलगा अतीस सिंह (अंदाजे वर्ष 25) असे या आरोपींचे नाव आहे. हे आरोपी सध्या फरार आहे.पोलिस या आरोपींच्या मागावर आहे. दरम्यान पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत एफआयआर 8 दिवसांपूर्वी नोंदवण्यात आला होता, मात्र त्या दिवशी तक्रारदार करणारी व्यक्ती दुसरी कोणीतरी होती.

हे ही वाचा : भयंकर बदला अन् शारजाहचे तुरुंग : क्रिशन परेराची अटक ते सुटका, एका महिन्यात काय घडलं?

दरम्यान या घटनेने संपूर्ण मानखुर्द शहर हादरलं आहे.दिवसाढवळ्या गोळीबाराने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता या प्रकरणात पोलिसांना आरोपींना जेरबंद करण्यात य़श येते का हे पाहावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT