आईला शेजाऱ्यासोबत पाहिलं नग्नावस्थेत, अन् मुलासोबत घडली थरकाप उडवणारी घटना
एका महिलेला तिच्या 8 वर्षाच्या मुलाने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना पाहिलं होतं. ज्यानंतर महिलेने मुलाची हत्या केल्याची घटना नोएडामध्ये घडली.
ADVERTISEMENT

नोएडा: नोएडाच्या (Noida) बदलपूर भागात एका भुरी नावाच्या महिलेने आपल्या 8 वर्षांच्या मुलाची अंकितची हत्या केली आणि त्याचा मृतदेह 150 किमी दूर संभल या जिल्ह्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीतच समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलाला महिलेने अशा पद्धतीने नेमकं का संपवलं याबाबतचं नेमकं कारणही आता अखेर समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा मुलगा (Son) अंकित याने आपल्या आईला (Mother) शेजारीच राहणारा ओमपाल याच्यासोबत नग्नावस्थेत पाहिले होते. त्यानंतर बदनामीच्या भीतीने आईने आपल्या मुलाची हत्या (Murder) केली. या प्रकरणी आरोपी महिला भूरी हिच्यासह तिचा प्रियकर ओमपाल, मानक आणि अमर सिंह अशा एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (woman 8 year old son immoral relationship with neighbor mother killing child noida crime news)
नेमकी घटना काय?
असं म्हणतात की आई आपल्या मुलावर सर्वात जास्त प्रेम करते, पण भूरीसाठी तिची वासना ही तिच्या मुलापेक्षाही जास्त प्रिय बनली. महिलेने आपल्या मुलाच्या प्रेमापुढे आपल्या वासनेला प्राधान्य दिले आणि या वासनेच्या आगीत तिने आपल्या निष्पाप मुलाचाही बळी घेतला. याच संपूर्ण घटनेविषयी आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, ग्रेटर नोएडामध्ये एक आईने वासनेपोटील आपल्या मुलाची नेमकी कशी हत्या केली.
