NCP : अजित पवारांच्या बैठकीला 5 आमदारांची दांडी, राजकीय भूकंप होणार?

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

ajit pawar trident hotel meeting 5 mla abscent sharad pawar ncp lok sabha election result 2024
अजित पवारांनी आज सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती.
social share
google news

Ajit Pawar Meeting : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज अजित पवारांनी राष्ट्रवादीची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला 5 आमदारांची दांडी मारली होती.  विशेष म्हणजे या आमदारांनी पक्षाला अनुपस्थित राहण्याबाबत कल्पना देखील दिली नव्हती. त्यामुळे हे आमदार नेमके गेले कुठे अशी चर्चा सुरू होती? त्यात अजित पवारांचे अनेक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असल्याने राजकीय भूकंपांच्या चर्चांना वेग आला आहे. (ajit pawar trident hotel meeting 5 mla abscent sharad pawar ncp lok sabha election result 2024)

अजित पवारांनी आज सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे आणि आण्णा बनसोडे या 5 आमदारांनी दांडी मारली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा सुरु झाली होती. 

हे ही वाचा : Amol Kirtikar : अवघ्या 48 मतांनी अमोल किर्तीकर कसे पडले?

दरम्यान लोकसभेतील खराब कामगिरी आणि विशेषत: बारामतीत पराभूत झाल्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाल्याने पक्षही खूश नव्हता. त्यात अनेक आमदार संपर्कात असून ते पुन्हा सामील होण्यास इच्छुक असल्याचा दावा शरद पवार पक्षाने केल्याने आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान या प्रवेशावर शरद पवार गटाकडून 9 जूनला निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत 5 आमदार का आले नाहीत? याबाबत पक्षाने अद्याप निवेदन दिलेले नाही. तरी देखील अजित पवार गटाने शरद पवारांचे सर्व दावे खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. 

हे ही वाचा : Eknath Shinde : मोदींच्या सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' खासदार होणार मंत्री?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT