Lok Sabha Election 2024: 'मी मुख्य निवडणूक आयुक्ताचा खून करेल', MVA च्या जागांचा अंदाज वर्तवत माजी मंत्र्याची धमकी

मुंबई तक

ADVERTISEMENT

माजी मंत्र्याची  मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकी
माजी मंत्र्याची मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकी
social share
google news

Lok Sabha Election 2024 EVM: जका खान, बुलढाणा: राज्यासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत. अशी स्थिती असताना निवडणूक आयोगाने जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 'राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला लोकशाही पद्धतीने मर्डर करेल' अशी थेट धमकी राष्ट्रीय कांग्रेसचे माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र पाठवून दिली आहे. सध्या त्या पत्राची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. (lok sabha election 2024 i will kill the chief election commissioner threatens ex minister predicting mva seats)

ADVERTISEMENT

काँग्रेस पक्षाचे माजी महसूल राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी हे आपल्या विविध अनोखे आंदोलन आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी धमक्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

हे ही वाचा>> Dombivali Blast : डोंबिवली हादरली! बॉयलरच्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू

संभाजी भिडे, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या खुनाची देखील त्यांनी मागच्या काळात धमकी दिली होती. आता पुन्हा त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचाच गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

वाचा ते पत्र जसच्या तसं...

यासंदर्भात माजी मंत्री सावजी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांनाच पत्र लिहिले आहे. पाहा या पात्रात त्यांनी काय विधान केलं आहे. 

'लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महा-विकास आघाडी या पक्षांकडेच आहे. या आधारे एकुण ४८ जागापैंकी ३८ ते ४० लोकसभेच्या जागा या महा-विकास आघाडीच्या येणारचं परंतु जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की, आपण ई.व्ही.एम. मशीन मध्ये घोटाळा करुन लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहातं असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्या शिवाय राहणार नाही.' 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Lok Sabha : गजानन कीर्तिकरांवर कारवाई होणार? CM शिंदे काय म्हणाले?

 

'माझे वय सध्या ८० वर्षाचे आहे. आता १० किंवा २० वर्ष जगायचे आहे. माझ्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पध्दतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड-उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही.' असं पत्रच त्यांनी लिहलं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT