Maharashtra Lok Sabha : दिग्गजांना लोळवलं, महाराष्ट्रात 'हे' उमेदवार ठरले 'जायंट किलर'!

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra lok sabha election result 2024 gaints lok sabha election result maharashtra result 2024
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे.
social share
google news

Maharashtra Lok sabha Election result 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. एकूण निकाल पाहता काही दिग्गजांची हार झाली आहे. तर काही मात्तबरांनी लौकिकाला साजेश यश मिळवले आहे.तर काही नवख्या चेहऱ्यांनी दिग्गजांना अस्मान दाखवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जायंट किलर ठरलेले ते उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (maharashtra lok sabha election result 2024 gaints lok sabha election result maharashtra result 2024)  

बीडमध्ये पकजांना धक्का 

बीड लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. सोनवणे यांना 6 लाख 83 हजार 950 मते पडली होती.तर पंकजा मुंडेंना 6 लाख 77 हजार 397 मते पडली होती. त्यामुळे 6 हजार 553 मतांनी सोनवणे जिंकले होते. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची आणि आमदारांची फौज होती, मात्र तरी देखील त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे बीडमध्ये बजरंग सोनवणे जायंट किलर ठरले आहेत. 

हे ही वाचा : फडणवीस सरकारमधून बाहेर पडणार! शिंदे सरकार धोक्यात येईल का?

नवनीत राणांचा पराभव  

अमरावती लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी भाजप आमदार नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. बळवंत वानखेडे यांना या निवडणुकीत 5 लाख 26 हजार 271 मतं पडली होती, तर नवनीत राणा यांना 5 लाख 6 हजार 540 मतं पडली आहेत. त्यामुळे 19 हजार 731 मतांनी राणांचा पराभव झाला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नंदूरबारमध्ये हिना गावित हरल्या

नंदूरबार लोकसभा मतदार संघात 10 वर्ष खासदार राहिलेल्या हिना गावित यांचा अॅड.  गोवाल पाडवी यांनी 1 लाख 59 हजार 120 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना 7 लाख 45 हजार 998 मते पडली आहेत. तर हिना गावित यांना 5 लाख 86 हजार 878 मतं मिळाली होती. 

दिंडोरीत भारती पवारांना झटका 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि भाजपच्या खासदार असलेल्या भारती पवार यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी 1 लाख 13  हजार 199 मतांनी पराभव केला. भास्कर भगरे यांना 5 लाख 77 हजार 339 मतं मिळाली होती. तर भारती पवार यांना 4 लाख 64 हजार 140 मते  पडली होती. कांदा प्रश्नामुळे भारती पवार यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहेत.  

ADVERTISEMENT

हे ही वाचा : महाराष्ट्रात भाजप का हरली? फडणवीसांनीच सांगितली चार कारणे

चंद्रपुरात मुनगंटीवारांना धक्का 

चंद्रपुर लोकसभा मतदार संघात भाजपचे सिनिअर लीडर सुधीर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 7 लाख 18 हजार 410 मतं पडली होती. त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांनी 2 लाख 60 हजार 406 मतांनी धानोरकर यांनी मुनगंटीवार सारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव केला होता. 

ADVERTISEMENT

अहमदनगरमध्ये निलेश लंकेंचा विजय 

अहमदनगर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला. सुजय विखे पाटील यांना 5 लाख 59 हजार 868 मतं पडली तर निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते पडली होती. त्यामुळे लंके यांनी 28 हजार 92 मतांनी विखेंचा पराभव केला.

ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे 

गेल्या 10 वर्षापासून खासदार असलेले आणि शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना 4 लाख 76 हजार 900 मतं पडली होती. तर सदाशिव लोखंडे यांना 4 लाख 26 हजार 371 मतं पडली होती. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50 हजार 529 मतांनी लोखंडेंचा पराभव झाला. 

जालन्यात दानवेंचा पराभव

जालना लोकसभा मतदार संघात पाच वेळा खासदार राहिलेल्या भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांचा काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी पराभव केला. कल्याण काळे यांना 6 लाख 7 हजार 879 मतं मिळाली होती. तर रावसाहेब दानवे यांना 4 लाख 97 हजार 939 मते पडली होती. त्यामुळे काळेंनी 1 लाख 9 हजार 958 मतांनी दानवेंचा पराभव केला.

भिवंडीत कपिल पाटलांना झटका 

भिवंडीतून दोन वेळचे खासदार राहिलेल्या कपिल पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी पराभव केला. सुरेश म्हात्रे यांना 4 लाख 99 हजार 464 मतं पडली होती. तर कपिल पाटलांना 4 लाख 33 हजार 343 मतं पडली होती. त्यामुळे म्हात्रे यांनी 66 हजार 121 मतांनी कपिल पाटील यांचा पराभव केला. 

धुळ्यात भामरेंना फटका 

धुळे लोकसभा मतदार संघातून दोन वेळ खासदार राहिलेले भाजप उमेदवार सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी पराभव केला. शोभा बच्छाव यांना 5 लाख 83 हजार 866 मतं पडली होती. तर सुभाष भामरे यांना 5 लाख 80 हजार 35 मतं पडली होती. शोभा बच्छाव यांनी 3831 मतांनी भामरे यांचा पराभव केला. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT