Lok Sabha : राज ठाकरेंची दिल्लीवारी, भाजपसमोर ठेवणार 'या' दोन जागांचा प्रस्ताव
BJP-MNS Alliance : या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे भाजपसमोर दोन जागांचा प्रस्ताव देखील ठेवणार आहेत.त्यामुळे आता भाजप आणि मनसेमध्ये युती होणार का? आणि मनसेचा दोन जागांचा प्रस्ताव भाजप मान्य करणार का?
ADVERTISEMENT
BJP-MNS Alliance : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सायंकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत त्यांची भाजप नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप-मनसेची युती होण्याची शक्यता आहे. या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे भाजपसमोर दोन जागांचा प्रस्ताव देखील ठेवणार आहेत.त्यामुळे आता भाजप आणि मनसेमध्ये युती होणार का? आणि मनसेचा दोन जागांचा प्रस्ताव भाजप मान्य करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ( mns raj thackeray delhi to meet devendra fadnavis chandrashekhar bawankule lok sabha seat sharing bjp mns alliance)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसेची युती होणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चा आज खऱ्या ठरताना दिसणार आहेत. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच दिल्लीत उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील तिथे उपस्थित आहेत. दिल्लीत भाजपची कोअर कमिटीची बैठक सूरू आहे. या बैठकीसाठीच हे नेते दिल्लीत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Shiv Sena UBT : ठाकरेंचे लोकसभेचे 17 शिलेदार ठरले?
दरम्यान आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची दिल्लीत भेट होणार आहे. या भेटीत भाजप-मनसेच्या युतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मनसे देखील सामील होणार आहे.तसेच मनसे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे भाजपसमोर दोन जागांचा प्रस्ताव ठेवणार आहेत. या दोन जागांवर मनसे निवडणूक लढवण्यास इच्छुक असणार आहे.
हे ही वाचा : 'हा नालायक.. त्यांचा भाऊही म्हणाला', शिवतारेंची टीका
'या' दोन जागांची मागणी
राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे दोन जागांची मागणी करण्याचा अंदाज आहे. राजकीय सुत्रानुसार, दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघावर मनसेची नजर आहे. या दोन जागा लढण्यास मनसे इच्छुक आहे. आता मनसेच्या या दोन जागांचा प्रस्ताव भाजप मान्य करणार का? मनसेच्या वाट्याला 'या' दोन जागा येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT