LoK Sabha Result 2024 : 'तिसऱ्यांदा NDA सरकार स्थापन करणार', PM मोदींचा विश्वास

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm narendra modi reaction on lok sabha election 2024 bjp office celebration nda made government in third time
देशवासीयांचेही आम्ही आभार मानतो.
social share
google news

Pm Narendra Modi Reaction on Lok Sabha Result : ''एनडीएचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणं निश्चित आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत. देशवासीयांचेही आम्ही आभार मानतो. देशवासियांनी भाजपावर, एनडीएवर विश्वास दाखवला. आजचा विजय देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. 140 कोटी जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवर दिली. (pm narendra modi reaction on lok sabha election 2024 bjp office celebration nda made government in third time) 

भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. भारत माता की जय आणि जय जगन्नाथ असे अशा घोषणा देत मोदी म्हणाले की, या आशीर्वादासाठी मी देशातील सर्व जनतेचा ऋणी आहे. आजचा दिवस खूप शुभ आहे. या शुभ दिवशी एनडीए सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. जनता जनदानचे आपण सर्वजण खूप खूप आभारी आहोत.

हे ही वाचा : Maharashtra Result: तुमचा खासदार कोण.. कोण विजयी, कोण पराभूत?

देशवासीयांनी एनडीए आणि भाजपवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. आजचा विजय हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. भारतीय राज्यघटनेवरील अतूट निष्ठेचा हा विजय आहे. विकसित भारताच्या वचनाचा हा विजय आहे. सबका साथ, सबका विकास या मंत्राचा हा विजय आहे, असे मोदी म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांनी याआधी ट्विट करून देखील निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक कामगिरी भाजप कार्यालयात पोहोचण्यापूर्वी पंतप्रधानांनी पोस्ट केले त्यांनी लिहिले- जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील ही ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यांनी लिहिले- मी जनतेला या आपुलकीसाठी सलाम करतो आणि त्यांना आश्वासन देतो की आम्ही जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकात केलेले चांगले काम सुरू ठेवू. मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम करतो. त्याच्या असाधारण प्रयत्नांना शब्द कधीही न्याय देणार नाहीत.

हे ही वाचा : Lok Sabha Election Result 2024 : लोकसभेच्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

दरम्यान 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. एनडीएला 291 जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडी 234 जागा जिंकली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT