TV9 C-Voter Exit Poll: पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात कोण जिंकणार?
Maharashtra Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. तसंच त्यांची जोरदार चर्चाही झाली. यासर्वात चर्चेत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा मतदार संघात कोण बाजी मारणार हे आपण TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 (lok sabha election 2024) ची लगभग संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघात पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. येत्या दोन दिवसात म्हणजेच 4 जून 2024 रोजी महाराष्ट्रातील लोकसभेच्या या मैदानात महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी? याकडे सर्वांचं लक्ष लागून पाहिलेलं आहे. पण आज (1 जून) जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलनुसार, कुठल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार याचा अंदाज जनतेला येईल.
अशा परिस्थितीत, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. तसंच त्यांची जोरदार चर्चाही झाली. यासर्वात चर्चेत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा मतदार संघात कोण बाजी मारणार हे आपण TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ABP C-Voter Exit Poll: महाराष्ट्रात BJPला मोठा हादरा, मविआची भरारी!
सातारा मतदारसंघात भाजकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरूद्ध लढत आहे. पण आज जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या माहितीनुसार मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. तर, भाजपा महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर असल्याचं दिसतंय आहे. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलनुसार जनतेने दिलेला कौल खरंच ठरेल की यामध्ये काही बदल घडतील हे आता 4 जून 2024 रोजी लोकसभ निवडणुकीच्या दिवशीच कळेल.
हे वाचलं का?
हेही वाचा : Exit Poll : 'इंडिया आघाडी'ला बहुमत मिळणार? महाराष्ट्रात किती मिळणार जागा?
एबीपी-सी व्होटरनुसार भाजपप्रणित NDA ला तब्बल 22 ते 26 जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळू शकतात.
भाजप - 17
शिवसेना (शिंदे गट)- 06
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 01
ADVERTISEMENT
असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
दुसरीकडे याच एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीला राज्यात एकूण 23 ते 24 जागा मिळू शकतात. हा आकडा इंडिया आघाडीसाठी नक्कीच दिलासादायक ठरू शकतो.
हेही वाचा : 'महाराष्ट्र BJP चा सगळा खेळ बिघडवेल', कोणी सांगितला नेमका आकडा?
काँग्रेस - 08
शिवसेना (ठाकरे गट)- 09
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 06
याशिवाय 1 जागा ही अपक्षाला मिळू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- सांगली मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर असून भाजपचे संजय पाटील आणि शिवसेना (UBT) चे चंद्रहार पाटील पिढाडीवर आहेत.
- कोल्हापूर मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती आघाडीवर असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक पिछाडीवर आहेत.
- सातारा मतदारसंघात भाजप उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत.
- पुणे मतदारसंघ भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर असून कॉंग्रेस नेते रवींद्र धंगेकर आणि वंचित उमेदवार वसंत मोरे पिछाडीवर आहेत.
- बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
- माढा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आघाडीवर आहेत तर, भाजपचे उमेदवार रणजीतसिंह- निंबाळकर पिछाडीवर आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT