Lok Sabha Election 2024: पालघरमधून लोकसभा लढवणाऱ्या ठाकरे गटाच्या भारती कामडी कोण?
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत त्यांनी 4 नव्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
ADVERTISEMENT
Who is Shivsena UBT Palghar Candidate Bharti Kamdi : शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत त्यांनी 4 नव्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर लढणार आहेत तर, हातकणंगलेमधून सत्यजित आबा पाटील यांना निवडणुकीच्या रणांगनात उतरवण्यात आलं आहे. तसंच जळगावातून करण पवार लढतील आणि महत्त्वाचं म्हणजे पालघरमधून भारती कामडी यांना लढायला मैदानात उतरवलं आहे. याआधी शिवसेनेने (UBT) 17 उमेदवारांची नावं जाहीर केली होती.
ADVERTISEMENT
यासर्वात आज आपण पालघरमधून लोकसभा लढणाऱ्या भारती कामडी नेमक्या कोण आहेत? हे सविस्तर जाणून घेऊयात.
कोण आहेत भारती पाटील?
- पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेना (UBT) नेत्या भारती कामडी यांची 2020 मध्ये निवड झाली.
- सध्या त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा ठाकरे गटाच्या महिला संघटिका आहेत.
- पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून भारती कामडी यांनी दीड वर्ष काम केलं.
- सातत्याने सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या कामडी यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते.
- त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमटवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती कामडी यांचे नाव शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी सुचवल्याने त्यांच्या नावाची उमेदवारी पुढे आली. एकंदरीत पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून भारती कामडी आणि महायुतीमधून शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजेंद्र गावित आमने सामने असतील असं म्हटलं जात आहे.
हे वाचलं का?
उमेदवारी जाहीर होण्याआधीच भारती कामडींच्या नावाचा बोलबाला
भारती कामडी विविध मुद्यांवरून सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसतात. उमेदवारी जाहीर होण्याआधीपासून त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू होता. लढणार आणि जिंकणार असं ठाम मत मांडत त्यांनी निवडणुकीची तयारीही केली होती. तरूणांच्या रोजगारापासून ते बालकांच्या कुपोषणापर्यंतचे मुद्दे त्यांनी खंबीरपणे मांडले होते. अशाप्रकारे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
कोरोना काळात आदिवासी लोक लस घेण्यास नकार देत होते मात्र भारती कामडींनी स्वत: जाऊन समाज बांधवांना लस घेण्यास प्रवृत्त केलं होतं. त्यांच्या अशा कामांमुळे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासूनच महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची चर्चा होती.
ADVERTISEMENT
याआधी 'या' 17 उमेदवारांची केलेली घोषणा
-
सांगली - चंद्रहार पाटील
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT