Aishwarya Rai: आधी ग्रे, आता डायमंड घटस्फोटाची चर्चा; ऐश्वर्या-अभिषेक बच्चन खरंच होणार वेगळे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

point

ग्रे आणि डायमंड घटस्फोट म्हणजे काय?

point

घटस्फोटाचे नेमके प्रकार किती?

Aishwarya and Abhishek Bachchan are really Getting Divorce : सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या पती-पत्नी मध्ये खटके उडत असल्याची चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात बच्चन कुटुंब एकत्र आल्याचे दिसले. तर,ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत वेगळी आलेली दिसली. यानंतरच बच्चन कुटुंबात मतभेद सुरू असून ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. ते ग्रे घटस्फोट घेणार असल्याचेही बोलले जाऊ लागले. (bollywood aishwarya rai and abhishek bachchan rumours of divorce what is difference between grey divorce and diamond divorce know the types of it)

ADVERTISEMENT

त्याचबरोबर, काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामवर एक घटस्फोटाची पोस्टही लाईक केली होती. त्यामुळे या स्वीट कपलच्या नात्यात कटूता आल्याचे म्हटले जाऊ लागले. इतकंच नाही तर, आधी अभिषेक आणि ऐश्वर्या ग्रे-घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात होते पण, आता मात्र  डायमंड घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशावेळी अनेकांना प्रश्न पडला आहे की, घटस्फोटाचे नेमके किती प्रकार आहेत? चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

हेही वाचा : Vinesh Phogat Retirement: 'आई... मी हरले'; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची मोठी घोषणा!

ग्रे आणि डायमंड घटस्फोट म्हणजे काय?

आजच्या काळात लोक म्हातारपणातही घटस्फोट घेत आहेत. पण, यापूर्वी असे घडत नव्हते. जेव्हा लोक लग्नाच्या अनेक वर्षांनी म्हणजे लग्नाच्या 40-50 वर्षांनंतर घटस्फोट घेतात त्याला ग्रे-घटस्फोट म्हणतात. या घटस्फोटात, बरेच जोडपे दीर्घकाळ एकत्र घालवल्यानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. यावेळी त्यांची मुलंही मोठी होतात.

हे वाचलं का?

इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर जोडीदारापासून वेगळे होणे सोपे नाही. या प्रकारच्या घटस्फोटाला ग्रे-घटस्फोट, सिल्व्हर स्प्लिटर किंवा डायमंड घटस्फोट असेही म्हणतात. ग्रे घटस्फोट मुख्यत्वे राखाडी केसांशी संबंधित आहे, जो 40-50 वर्षानंतरच्या कपल्ससाठी सामान्य आहे. भारतात हे नवीन असेल, पण पाश्चिमात्य देशांमध्ये हा ट्रेंड जुना आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : खात्यात एक रुपया पोहोचलाच नाही, 'त्या' 16 लाख महिला अर्जदारांचं काय होणार?

घटस्फोटाचे नेमके प्रकार किती?

दोष घटस्फोट

एखाद्याच्या चुकांमुळे घटस्फोट घेणे ही पूर्वीची पद्धत होती. यालाच दोष घटस्फोट म्हणतात. यासाठी, हे सिद्ध करावे लागते की जोडीदारांपैकी एकाने काहीतरी चुकीचे केले आहे ज्यामुळे त्यांचे नाते संपुष्टात आले आहे. पण आता दोष घटस्फोटाची प्रकरणं कमी दिसतात. त्याऐवजी लोक नातं संपवण्यासाठी दोष रहित घटस्फोटाचा शोध घेत आहेत. 

ADVERTISEMENT

एकमेकांच्या सहमताने घेतलेला घटस्फोट (दोषरहित घटस्फोट)

आजच्या काळात दोन व्यक्तींमधील मतभेद न्यायालयापर्यंत पोहोचतात. त्याच वेळी, अशी काही जोडपी आहेत जी एकमेकांच्या सहमताने कोणत्याही चुकांशिवाय वेगळे होण्याचा निर्णय घेतात. यामध्ये, जोडीदार एकमेकांवर कोणत्याही प्रकारचे आरोप करत नाहीत.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Nag Panchami 2024: नागपंचमीचा शुभ मुहूर्त कधी, केव्हा करावी नागाची पूजा?, विधी आणि उपाय

विवादित घटस्फोट

जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार घटस्फोटाच्या निकालाच्या काही पैलूंवर सहमत होऊ शकत नाही तेव्हा विवादित घटस्फोट होतो. यामध्ये घटस्फोट घ्यायचा की नाही, मालमत्तेची किंवा कर्जाची विभागणी कशी करावी, मुलांचा ताबा, मूल किंवा जोडीदाराचा सांभाळ अशा वेळवेगळ्या मुद्द्यांवर सहमती होत नाही. 

बिनविरोध घटस्फोट

बिनविरोध घटस्फोटात तुम्ही आणि तुमचा जोडीदार घटस्फोटाच्या तडजोडीवर एकमताने सहमत होता. यावेळी कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला न्यायालयाची आवश्यकता भासत नाही. यामध्ये तुम्ही विभक्त कराराचा मसुदा तयार करण्यासाठी (किंवा कोर्टात सादर केलेल्या घटस्फोटाच्या आदेशानुसार) एकत्र काम करणे आणि पालकत्वासाठी तुमची स्वतःची योजना बनवणे समाविष्ट आहे. घटस्फोटाच्या या प्रकारात कोर्टाची फारशी गरज नसून जोडपे आपापसात तडजोड करतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT