Bado Badi: युट्युबने का डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे 'बदो-बदी' गाणे?
Bado Badi Viral Song : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक गाणे खूप ट्रेंडिंग आहे. कथित पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानचे हे 'बदो-बदी' गाणे आहे. पण, सध्या या गाण्याची चर्चा होतेय कारण यूट्यूबने ते डिलीट केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
चाहत फतेह अली खान कोण आहे?
Chahat Fateh Ali Khan Bado Badi Song : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक गाणे खूप ट्रेंडिंग आहे. लोकांनी या गाण्यावर अनेक कॉमेडी रिल्स बनवल्या. कथित पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानचे हे 'बदो-बदी' गाणे आहे. पण, सध्या या गाण्याची चर्चा होतेय कारण यूट्यूबने ते डिलीट केले आहे. यामागचे नेमके कारण काय? असे का करण्यात आले? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (why did youtube delete chahat fateh ali khan bado badi song Which get 28 million views)
ADVERTISEMENT
'बदो-बदी' हे गाणे कॉमेडी सॉन्ग म्हणून प्रचंड व्हायरल झाले. खरं तर, हे गाणे मीमचा एक भाग बनले. भारत आणि पाकिस्तानातील लोकांनी या गाण्यावर खूप मीम्स बनवले. यामुळे या गाण्याला जवळपास 28 मिलियन व्ह्यूज मिळाले. मात्र आता कॉपी राइट्समुळे यूट्यूबने हे गाणे डिलीट केले आहे.
हेही वाचा : बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख, मोदी NDA च्या बैठकीत काय बोलले?
चाहत फतेह अली खानची गाण्याची शैली लोकांना खूप मजेदार वाटली. त्याची यापूर्वीची काही गाणीही व्हायरल झाली होती. मात्र यूट्यूबने आता सर्वात जास्त व्ह्यूज मिळालेलं 'बदो-बदी' गाणं डिलीट केलं आहे. माहितीनुसार, या गाण्याला कॉपीराइट स्ट्राइक मिळाला आहे. या गाण्याचे लिरिक्स 1973 मध्ये रिलीज झालेल्या नूरजहाँच्या 'बनारसी ठग' या चित्रपटातले आहे. व्हायरल झाल्यानंतर, याला यूट्यूबवर 28 मिलियन व्ह्यूज मिळाले.
हे वाचलं का?
'बदो-बदी' हे गाणे अधिकृत चाहत फतेह अली खान नावाच्या चॅनलवरून अपलोड करण्यात आले होते. यामध्ये चाहतसोबत मॉडेल वजदान रावही दिसली. काही दिवसांपूर्वी वजदानचा एक व्हिडिओही आला होता ज्यामध्ये ती म्हणत होती की, चाहतने या गाण्यातून खूप पैसे कमावले पण तिला काहीच मिळाले नाही.
हेही वाचा : पहिलाच भाषणात नितीश कुमार PM मोदींना 'असं' का म्हणाले?
चाहत फतेह अली खान कोण आहे?
चाहत फतेह अली खान हा पाकिस्तानचा आहे. तो स्वत:ला कलाकार समजतो. त्याला पाकिस्तानातील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनायचे आहे. चाहतचे नाव आधी काशिफ राणा होते. अनेक ठिकाणी त्याला अली अदान म्हणूनही ओळखले जाते. पण नुसरत फतेह अली खानच्या एका शोमुळे त्याने त्याचे नाव काशिफवरून बदलून चाहत फतेह अली खान असे ठेवले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "अखेरच्या टप्प्यावर मी...", माधव भंडारींचा भाजप कार्यकर्त्यांना 'मेसेज'
याआधीही चाहत त्याच्या गाण्यांमुळे अनेकदा चर्चेत आला होता. ही सर्व गाणी चाहतने स्वत: लिहिली आहेत. मात्र बदो बदी हे गाणं त्याने स्वतः लिहिलेलं नाही. त्याने ते रिक्रीएट केले आणि आता कॉपीराइटच्या समस्येमुळे तो अडचणीत सापडला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT