Ashok Saraf : आता कंडक्टर नाही तर... 'नवरा माझा नवसाचा 2' मधील भूमिकेबाबत अशोक मामांनी सांगितलं मोठं सीक्रेट!
Navra Majha Navsacha 2 : लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटात स्वप्नील जोशीचीही एन्ट्री पाहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'नवरा माझा नवसाचा 2' मधील भूमिकेबाबत अशोक मामांनी सांगितलं मोठं सीक्रेट
‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित
Navra Majha Navsacha 2 : लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटात स्वप्नील जोशीचीही एन्ट्री पाहायला मिळणार आहे.अशावेळी आज मुंबई Tak च्या बैठकीत या टीमने दिलखुलास गप्पा मारल्या. पण या गप्पांमध्ये अशोक सराफ यांनी मोठं सीक्रेटचा खुलासा केला.
ADVERTISEMENT
सचिन पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.काही दिवसांपूर्वीच सचिन पिळगांवकर यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबद्दल घोषणा केली होती. या चित्रपटाचे संवाद, गाणी सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. आज या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील पहिलं गाणंही प्रदर्शित झालं आहे. त्याचबरोबर मुंबई Tak बैठकीत अशोक मामांनी ते या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहेत हे सांगितलं आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल: फडणवीस
'नवरा माझा नवसाचा'या चित्रपटाच्या पहिल्या भागात बसमधला प्रवास दाखवण्यात आला होता. त्याचबरोबर अशोक सराफ हे या बसमधील कंडक्टरची भूमिका साकारत होते. पण आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कोकण रेल्वेचा प्रवास दाखवण्यात आला आहे आणि अशोक मामा या रेल्वेतील टीसीची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे चाहते 20 सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा : Supriya Sule Mumbai tak Baithak 2024: "एकाच गोष्टीमुळे मी लोकसभेला तरले"
‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित
“डम डम डम डम डमरू वाजे…” या गाण्यात सचिन व सुप्रिया पिळगांवकरांनी जोडीने ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय त्यांना या गाण्यात स्वप्नील जोशी व हेमल इंगळे यांनी देखील साथ दिलेली आहे. हे गाणं स्वत: सचिन पिळगांवकर आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांनी गायलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT