Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल: फडणवीस

साहिल जोशी

ADVERTISEMENT

पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल मिळेल: फडणवीस
पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल मिळेल: फडणवीस
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई Tak बैठकीत फडणवीसांची शरद पवारांवर टीका

point

शरद पवार यांना पक्ष फोडण्यात गोल्ड मेडल मिळेल, फडणवीसांची टीका

point

पुन्हा सत्तेत आलो.. यावर काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis on Sharad Pawar: मुंबई: 'आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड हा सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावावर आहे. देशामध्ये जर पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर गोल्ड मेडल पवार साहेबांना मिळेल.' असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट बोचरी टीका केली. मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना फडणवीसांना हा हल्लाबोल केला. (devendra fadnavis mumbai tak baithak 2024 pawar saheb will get gold medal if contest to split party said devendra fadnavis) 

मी सत्तेत पुन्हा आलो पण येताना दोन पक्ष फोडून आलो.. असं विधान करणं तुम्हाला भोवलं का? या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी थेट शरद पवारांनाच टार्गेट केलं. पाहा मु्ंबई Tak बैठकीत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

हे ही वाचा>> Eknath Shinde : ''मला अडकण्याचा डाव होता'', मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानाने खळबळ

'आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड हा पवार साहेबांच्या नावावर'

'एक गोष्ट निश्चित आहे की, पवार साहेबांनी अतिशय अनुभवाने जागा निवडल्या. याचं त्यांचा श्रेय द्यावं लागेल. अँटी इन्कम्बन्सी कुठे आहे याचा विचार करून त्यांनी जागा निवडल्या. त्यांनी ज्या जागा निवडल्या.. कमी जागा घ्यायच्या.. मला असं वाटतं की, पवार साहेब आताही ते कमीच जागा घेतील. कमी जागा घ्यायच्या पण निवडून येणाऱ्या जागा घ्यायच्या..' 

'पवार साहेबांना सहानुभूती मिळाली आणि त्यांनी खूप जागा जिंकल्या अशी परिस्थिती नाही.. आता बीडची जागा ते निवडून आले. ६ हजार मतांनीच निवडून आले ना.. तिथे कुठे सहानुभूती आहे, ध्रुवीकरणावरच ते निवडून आले.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'मला एक सांगा.. पवार साहेबांनी किती पक्ष फोडले? आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड हा सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावावर आहे. देशामध्ये जर पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर गोल्ड मेडल पवार साहेबांना मिळेल.यामुळे मला असं वाटतं की इको सिस्टिमला पकडून हा जो काही एक सहानुभूतीचा फॅक्टर तयार केला जातो.. तो थोडा चालतो पण फार नाही चालत.' 

'एवढं सगळं असतं तर ४३.६ आणि ४३.९ त्यांना मतं का मिळाली. फक्त ०.३ टक्क्यांचा फरक का? हा फरक ४-५ टक्के हवा होता.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले

'ते मी गंमतीत बोललो होतो...'

2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात 'मी पुन्हा येईन...' असं विधान केलं होतं. पण विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय उलथापालथ झाली त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. ज्यानंतर त्यांना 'पुन्हा येईन' यावरून बरंच ट्रोल केलं गेलं.

ADVERTISEMENT

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा शिंदे सरकार आलं. ज्यामध्ये फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. ज्यानंतर लोकसभा निवडणुकीआधी एका मुलाखतीत फडणवीस यांना 'पुन्हा येईन' यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, 'मी सत्तेत पुन्हा आलो.. आणि येताना दोन पक्ष फोडून आलो..' 

ADVERTISEMENT

पण त्यांचं हेच विधान पुन्हा चर्चेत आलं. ज्यावरून ते ट्रोल झाले. याबाबत मुंबई Tak बैठकीत त्यांनी असं विधान का केलं हे सांगितलं.

पहिली गोष्ट म्हणजे मी एकदाच बोललो आणि ते गंमतीत बोललो... पण इको सिस्टमने पकडलं आणि तेच चालवलं... पण ठीक आहे.. ते त्यांचं काम आहे. पण आम्ही हे सातत्याने सांगितलं की, कोणी कोणाचा पक्ष फोडू शकत नाही. त्या-त्या पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले आहेत. त्या ठिकाणी उद्धवजींकडे आणि पवार साहेबांकडे ज्या वेळेस शिंदे साहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं.. की पक्षात आमचं कोणतंही भविष्य नाही. कारण इकडे आदित्य ठाकरेंना भविष्य आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळेंना भविष्य आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं विधान हे गंमतीतील होतं असा दावा केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT