Big Boss Marathi च्या घरात 'गुलीगत राडा'! फालतू म्हणणाऱ्या जान्हवीसोबत सूरजचा तुफान वाद

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूरजच्या नव्या अवताराने सर्वच अवाक्!

point

सूजरशी पंगा जान्हवीला पडणार महागात? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

point

पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा वार

Big Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये (Big Boss Marathi season 5) पहिलाच आठवडा तुफान रंगाला. शो होस्ट रितेश देशमुखनेही 'भाऊच्या धक्क्यावर' प्रत्येकाची खबर घेत त्यांच्या चुका दाखवून दिल्या. आता चाहते दुसऱ्या आवड्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया हँडलवर एक नवीन प्रोमो पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा गुलीगत राडा पेटला आहे. पण या राड्यात जान्हवीसोबत आर्या जाधवनसून सूरज चव्हाणने एन्ट्री घेतली आहे. (Big Boss Marathi season 5 suraj chavan and janhvi killekar fight clash new promo out

जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण भांडत आहेत. प्रोमोमध्ये जान्हवी म्हणते, "तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना... माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही. किती फालतू आहे हा..." यावर संतापत सूरजनेही गुलीगत पलटवार केला. तो म्हणाला, "तू निघ... चल फूट". हा वाद होत असताना घरातील इतर सदस्यांनी वाद सोडवण्याचाही प्रयत्न केला.

हेही वाचा : Bangladesh Violence: आरक्षणाच्या वादामुळे पंतप्रधानपद गेलं, बांग्लादेशात तुफान हिंसाचार.. शेख हसीना भारतात!

सूरजच्या नव्या अवताराने सर्वच अवाक्!

बिग बॉस मराठी 5 चा पहिला आठवडा संपलेला आहे. संपूर्ण आठवड्यात सूरज चव्हाण फार अॅक्टिव्ह दिसला नाही. तो खूप शांत होता. पण, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने त्याला चांगलाच डोस दिला. शांत न राहता, कोणालाही न घाबरता खेळण्यास त्याला सांगण्यात आले आहे. यामुळे प्रोमोमध्ये तरी तो अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहे. आता पुढे तो संपूर्ण आठवडा कसा खेळेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Mukhyamantri Annapurna Yojana : महिलांनो...तरच वर्षाला तीन सिलिंडर मिळणार मोफत, कारण...

सूजरशी पंगा जान्हवीला पडणार महागात? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘निक्कीच्या आधी जान्हवीच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार. सूरजसोबत पंगा घ्यायचा नाही, त्याच्यासोबत अख्खा महाराष्ट्र आहे’, असं एका यूजरने लिहिलंय. तर ‘सूरजला पूर्ण पाठिंबा आहे, जान्हवी लवकरच घराबाहेर जाणार’, असं दुसऱ्या यूजरने लिहिलंय. ‘सूरज आणि डीपी दादाला पाठिंबा दिला पाहिजे. कारण ते गरीब घरातील आहेत, खेड्यापाड्यातील आहेत’, असंही काहींचं म्हणणं आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल, पैसे मिळणार की नाही?

पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा वार

बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा वार झाला आहे. 16 सदस्यांपैकी आता घरात 15 सदस्य आहेत. सूरज चव्हाण, वर्षा उसगावकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार आणि किर्तनकार पुरुषोत्तम पाटील हे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. त्यापैकी आता पहिल्या आठवड्यात पुरूषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT