Bigg Boss Marathi : निक्की अरबाजमध्ये होणार कडाक्याचे भांडण, कॅप्टन्सी टास्कवरून घरात तुफान राडा?
Bigg Boss marathi Season 5 : बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टन्सी टास्क दिला आहे. या टास्कनुसार घरातील सदस्यांना अड्डे मिळवून कॅप्टन पदासाठी नको असलेल्या उमेदवाराच्या घरट्यात अंडे टाकायचे आहे. या टास्कसाठी दोन ग्रृप तयार करण्यात आले आहेत. टीम ए मध्ये निक्की, अरबाज, वर्षा ताई, सूरज चव्हाण आणि डीपीदादा आहेत. तर टीम बी मध्ये जान्हवी, संग्राम, अंकिता, अभिजीत आणि पंढरीनाथ आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टन्सी टास्क दिलाय
या कॅप्टन्सी टास्कदरम्यान अरबाज निक्कीमध्ये होणार भांडण
अरबाज निक्कीच्या भाडणाचा प्रोमो आला समोर
Bigg Boss marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आठवा आठवडा सुरू झाला आहे. या आठव्या आठवड्यात बुधवारी कॅप्टन्सी टास्कही सूरूवात झाली आहे. यामध्ये बुधवारी कॅप्टन्सीच्या शर्यतीतून पंढरीनाथ कांबळे (Pandharinath Kamble) आणि अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar)बाद झाले आहेत. तर आज अरबाजने (Arbaaz Patel) ठरवलेली रणनिती निक्कीमुळे (Nikki Tamboli) अपयशी ठरल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भातला प्रोमोही समोर आला आहे. (bigg boss marathi arbaz patel angry on nikki tamboli captaincy game plan bigg boss marathi season 5)
ADVERTISEMENT
बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टन्सी टास्क दिला आहे. या टास्कनुसार घरातील सदस्यांना अड्डे मिळवून कॅप्टन पदासाठी नको असलेल्या उमेदवाराच्या घरट्यात अंडे टाकायचे आहे. या टास्कसाठी दोन ग्रृप तयार करण्यात आले आहेत. टीम ए मध्ये निक्की, अरबाज, वर्षा ताई, सूरज चव्हाण आणि डीपीदादा आहेत. तर टीम बी मध्ये जान्हवी, संग्राम, अंकिता, अभिजीत आणि पंढरीनाथ आहेत.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: महिलांना खरंच 4500 रुपये मिळणार का?, कारण...
आजच्या प्रोमोत तुम्ही पाहू शकता, अरबाज ए टीम ला स्ट्रेटेजी सांगताना दिसत आहे. यामध्ये अरबाज पहिल्या राऊंडमध्ये अंडं मिळवून अभिजीत आणि संग्रामला बाहेर काढू अशी रणनिती आखताना दिसतोय. तर निक्की जान्हवीच्या नावासाठी आग्रही असते. पण अरबाज तिला दुसऱ्या राऊंडमध्ये बाहेर काढूया, असे सांगतो.
हे वाचलं का?
टास्कमध्ये काय घडलं?
टास्कच्या पहिल्या फेरीत टीम ए कडून अरबाज पटेल आणि निक्की तंबोळी येतायत. तर टीम बी कडून संग्राम आणि जान्हवी येतात. पहिल्या फेरीत दोन्ही वेळेस अरबाज संग्रामला रोखतो तर निक्की अंड मिळवण्यास यशस्वी ठरते. पण ग्रूपमध्ये, ठरल्यानुसार अभिजीत आणि संग्रामला कॅप्टन्सीमधून बाद करण्याऐवजी निक्की अंकिता आणि पॅडीला बाद करते.
निक्कीच्या या गेम प्लानमुळे अरबाज तिच्यावर चांगलाच भडकतो. तिने मला धोका दिला, असे अरबाज म्हणतो. तर मी तिथे विसरली आणि मला तिकडे पॅडी दादांना बाहेर काढायचे होते? असे निक्की म्हणताना दिसतेय. त्यावर अरबाज तिला तु इतक्या लवकर कशी विसरली? असे रागात विचारताना दिसतोय. त्यानंतर अरबाज घरातील वस्तुंना लाथ आणि हात मारून आपला राग व्यक्त करताना दिसतो आहे. त्यामुळे या कॅप्टन्सी टाक्समुळे अरबाज आणि निक्कीमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Aishwarya-Abhishek यांच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण...
दरम्यान आता कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज पुढची रणनिती काय आखणार? बी टीमचा कॅप्टन होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT