Bigg Boss Marathi : ''अंकिता तुमचा प्रवास इथेच संपतो...'', 'कोकण हार्टेड गर्ल' घराबाहेर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg boss marathi riteish deshmukh announced ankita walawalkar eviction from bigg boss team b become emotion
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर?

point

पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला.

point

बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना बसणार धक्का

Ankita Walawalkar Exit, Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुख सर्व सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली. तर आज बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना आणखी एक धक्का बसणार आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे. या संदर्भातला प्रोमोही समोर आला आहे.  (bigg boss marathi riteish deshmukh announced ankita walawalkar eviction from bigg boss team b become emotion) 

नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरचा बिग बॉस मराठी मधला प्रवास संपल्याचे दिसत आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला रितेश देशमुख हा या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता असे सांगतो. रितेशने अंकिताचे नाव घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : दुसऱ्या टप्प्यात 52 लाख महिलांना मिळणार लाभ, तुमच्या बँकेत किती पैसे येणार?

रितेश देशमुख यांनी नाव घेतल्यानंतर अंकिता उठून तिच्या नावाची पाटी घेते आणि सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. रितेशने अंकिताचा प्रवास संपल्याचे जाहीर करता धनंजय पवार आणि सूरजला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहेत. तसेच अंकिताच्या चाहत्यांनाही याचा धक्का बसला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खरं तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्यात घरात मानकाप्याची एन्ट्री झाली होती. त्यामुळे बिग बॉसने दिलेल्या नियमानुसार प्रत्येकाला घरात जोडीने राहणं बंधनकारक होतं. यावेळी घरात नॉमिनेशन कार्य सुद्धा जोडीनेच पार पडलं होतं. घरातील अन्य सदस्यांनी मिळून निक्की – अभिजीत आणि वर्षा – अंकिता यांच्या दोन जोड्यांना नॉमिनेट केलं. परिणामी, या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य नॉमिनेट झाले. त्यापैकी आज  अंकिता वालावलकर घराबाहेर पडणार असल्याचे प्रोमोत दिसते आहे. 

हे ही वाचा : Nandurbar Crime : आई, पोटात दुखतंय; डॉक्टरांकडे जाताच बापाचं पितळ उघडं पडलं, नेमकं काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT