Cervical Cancer ने पूनम पांडेचा मृत्यू, नेमकं काय आहे हा आजार?
अभिनेत्री पूनम पांडेचं ‘सर्व्हायकल कॅन्सर’ म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानं मृत्यू झाला. त्यामुळे हा कर्करोग होतो कसा आणि त्याची लक्षणं कशी आहेत. त्याची आता गंभीर चर्चा होऊ लागली. या कर्करोगाची लक्षणं सर्वसामान्य दिसत असली तरी लैंगिकतेविषयी असलेली संकोचाची भावना हेच या रोगाचं कारण असल्याचंही तज्ज्ञ सांगतात.
ADVERTISEMENT

Poonam Pandey: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) ‘सर्व्हायकल कॅन्सर’ (Cervical cancer) म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानं मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तिच्या मॅनेजरने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘पूनम पांडे गेल्या कित्येक दिवसांपासून गंभीर आजारानं त्रस्त होती. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. परंतु त्याबाबत जागरुकता नसल्यामुळे त्यावर लवकर उपाय केले जात नाहीत, आणि त्यामुळे उपचारही वेळेवर होत नाहीत.
संकोचाची भावना
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या 2021 च्या अहवालानुसार, ‘भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण 11 ते 13 टक्के आहे. हे प्रमाण वैद्यकीय शास्त्रानुसार प्रचंड मोठं आहे. 2019 मध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे भारतात 45 हजार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 2020 मध्ये ही संख्या 77 हजारपर्यंत गेली आहे. भारतात लैंगिक आजारांबाबत संकोचाची भावना असल्यामुळे हा आजार अधिक घातक बनत चालला आहे.
घातक ट्यूमर
शरीरात जेव्हा खराब पेशींच प्रमाण वाढत जाते तेव्हा त्याला कर्करोग झाल्याचे म्हटले जाते. कर्करोग हा शरीराच्या ज्या भागामध्ये प्रथम आढळतो त्याच नावाने त्याला ओळखलं जाते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखात होणारा कर्करोग आहे, त्यामुळे त्याला सर्वसामान्यांच्या भाषेत त्याला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असं म्हटलं जाते. गर्भाशयाच्या खालच्या भागात एक घातक प्रकारचा तो एक ट्यूमर आहे. तो ट्यूमर नंतर गर्भाशयाच्या खालच्या भागापासून योनीमार्गाच्या वरच्या भागापर्यंत जातो आणि तो घातक होतो.
हे ही वाचा >> ‘पॉर्न पाहण्याची लागलेली सवय..’ अल्पवयीन मुलाला कसं संपवलं?, आरोपी बापानेच सांगितला घटनाक्रम!
ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) च्या संसर्गामुळे होत असतो. सर्वसामान्यांच्या भाषेत त्याला लैंगिक संक्रमित विषाणू असंही म्हटले जाते. कर्करोग तज्ज्ञांच्या मतानुसार, महिलेला ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसची लागण झाल्यानंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका कायम असतो. लैंगिक संक्रमित विषाणूमुळे असुरक्षित संभोग करणाऱ्या महिलांमध्येही गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. तीनपेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या महिला आणि गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांमध्ये या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.










