Gadar 2 ची तुफान कमाई, पाचव्या दिवशीच रचला इतिहास!
‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर गदरच केला आहे. सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण पाचव्या दिवशी चित्रपटाने केलेले कलेक्शन सर्वांच्या कल्पनेपलीकडचे आहे. गदर 2 ने स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीत कॅश इन केले. या चित्रपटाने 55 कोटींचे धमाकेदार कलेक्शन केले आहे.
ADVERTISEMENT
‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर गदरच केला आहे. सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण पाचव्या दिवशी चित्रपटाने केलेले कलेक्शन सर्वांच्या कल्पनेपलीकडचे आहे. गदर 2 ने स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीत कॅश इन केले. या चित्रपटाने 55 कोटींचे धमाकेदार कलेक्शन केले आहे. (Gadar 2 Box Office Day 5 Record Breaking Collection)
गदर 2 ची जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन!
गदर 2 च्या कमाईचा आकडा जाणून तुम्हालाही आश्चर्य होईल. खऱ्या अर्थाने सनी देओलने ‘गदर’ बनवला आहे. या चित्रपटाने 5 व्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. गदर 2 ने स्वातंत्र्यदिनी जबरदस्त कलेक्शन करून इतिहास रचला आहे. शुक्रवारी (11 ऑगस्ट) 40 कोटींच्या दणक्यात खाते उघडणाऱ्या गदर 2 ने दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी कमावले. रविवारी तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 51.7 कोटींची कमाई करत गदरच केला.
Raj Thackeray vs BJP: ‘दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वत:चा..’, राज ठाकरेंनी भाजपला झोडपलं!
सनी देओलचा हा चित्रपट फर्स्ट मंडे टेस्ट फ्लाइंग नंबर्ससह पास झाला आहे. चौथ्या दिवसाची कमाई 38.7 कोटी होती. पाचव्या दिवसाच्या व्यवसायातून गदर 2 ने बॉक्स ऑफिस कलेक्शन किती जबरदस्त आहे हे सिद्ध केले. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, गदर 2 ने 5 व्या दिवशी (15 ऑगस्ट) 55 कोटींची कमाई केली. यासह चित्रपटाचे एकूण 5 दिवसांचे कलेक्शन 228 कोटी झाले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
गदर 2 ने तोडले ‘हे’ रेकॉर्ड
सनी देओलच्या चित्रपटाने 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चित्रपटाचे अप्रतिम कलेक्शन हा निर्माते, स्टारकास्ट आणि चाहत्यांसाठी मोठा आनंद आहे. 22 वर्षांनंतर सनीच्या या चित्रपटाला मिळालेला उदंड प्रतिसाद प्रशंसनीय आहे. सनीचा हा चित्रपट सर्वात वेगान् 200 कोटी कमावणारा चित्रपट ठरला आहे. इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या तुलनेत पठाणने 4 दिवसांत 212.5 कोटी कमावले. KGF 2 (हिंदी) ने 5 दिवसात 229 कोटी जमा केले. तर बाहुबली 2 ने 6 दिवसात 224 कोटींची कमाई केली होती. गदर 2 चे 5 दिवसांचे अधिकृत कलेक्शन 228 पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. असं झाल्यास, सनी देओलचा चित्रपट झटपट 200 कोटी कमावणारा दुसरा सर्वात मोठा चित्रपट बनेल.
‘…याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका’, शिवसेना (UBT) शिंदेंवर का भडकली?
अनेक वर्षांपासून बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या सनी देओलच्या करिअरसाठी गदर 2 गेम चेंजर ठरेल. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की गदर 2 हा सनीचा 200 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट आहे. सनी देओलचा हा चित्रपट 2023 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. सध्या हा क्रमांक ‘द केरळ स्टोरी’कडे आहे, ज्याचे कलेक्शन 242 कोटी आहे. गदर २ च्या सध्याच्या कमाईचा विचार करता हा आकडा पार करणे अगदी सोपे आहे.
ADVERTISEMENT
“मला चेकमेट करण्याचा…”, अजित पवार-शरद पवारांची भेट, शिंदेंचं सूचक विधान
चाहत्यांमध्ये सनीची वाढती क्रेझ!
5 दिवसांनंतरही गदर 2 ची वाढती क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळतेय. सनीचे चाहते वेडे झाले आहेत. लोक ट्रॅक्टर घेऊन चित्रपटगृहाबाहेर पोहोचत आहेत. हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. चित्रपटाच्या यशामुळे सनी खूप खूश आहे. चित्रपटगृहात जाऊन तो चाहत्यांना भेटत आहे. गदरची ही तुफानी कमाई इथेच थांबणार नाही. चित्रपटाचा दुसरा वीकेंड आणखीनच धमाकेदार असेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT