या मराठमोळ्या दिग्दर्शकाची बॉलिवूड झेप, कार्तिक आर्यन झळकणार प्रमुख भूमिकेत
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट सिनेमे देऊन अल्पावधीतच लोकप्रिय झालेला दिग्दर्शक समीर विद्वांसने आता थेट बॉलिवूडमध्ये जाऊन पोहचलाय.आता समीर विद्वांस बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहे. तो अभिनेता कार्तिक आर्यनसोबत काम करणार आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे समीरने या चित्रपटाची घोषणा केली आहे. समीर विद्वांसचा लवकरच ‘सत्यनारायण की कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा […]
ADVERTISEMENT
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट सिनेमे देऊन अल्पावधीतच लोकप्रिय झालेला दिग्दर्शक समीर विद्वांसने आता थेट बॉलिवूडमध्ये जाऊन पोहचलाय.आता समीर विद्वांस बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहे. तो अभिनेता कार्तिक आर्यनसोबत काम करणार आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे समीरने या चित्रपटाची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
समीर विद्वांसचा लवकरच ‘सत्यनारायण की कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा समीरने नुकताच ट्विटरद्वारे केली आहे. ‘एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या’ असे समीरने ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच समीरने चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे.समीरच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘सत्यनारायण की कथा’ असे असून या चित्रपटात बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. हा चित्रपट २०२२मध्ये रिलीज होणार आहे.
हे वाचलं का?
समीरने ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच समीरची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘समांतर २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT